शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात महिलेचा खून

By admin | Updated: May 1, 2016 02:57 IST

हिल टॉप कॉलनी, खंडाळा येथील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री डोक्यात व हातावर जखमा करून खून केल्याची घटना मध्यरात्री १२:३०च्या

लोणावळा : हिल टॉप कॉलनी, खंडाळा येथील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री डोक्यात व हातावर जखमा करून खून केल्याची घटना मध्यरात्री १२:३०च्या सुमारास उघड झाली. या प्रकरणी मृत महिलेचे पती जगन्नाथ पांडुरंग मकर (वय ६०, रा. बंगला नं. ६७, हिल टॉप कॉलनी, खंडाळा) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बंगलामालकाच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.रंजना जगन्नाथ मकर (वय ५५, रा. हिलटॉप कॉलनी, खंडाळा) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बंगलामालक यांचा ड्रायव्हर चंद्रदेव ऊर्फ चंदन उमेद कामथी याने हा खून केला असल्याचा संशय मृत रंजना यांचे पती जगन्नाथ यांनी फिर्यादीमध्ये व्यक्त केला आहे.शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकर कुटुंब मागील ३० वर्षांपासून हिल टॉप कॉलनी येथील पल्लवी पारेख यांच्या बंगल्यात माळीकाम करीत आहे. शुक्रवारी पारेख यांचा ड्रायव्हर मालकांचे पाहुणे सहारा अ‍ॅम्बी व्हॅली येथे सोडून पारेख यांच्या बंगल्यावर राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी सकाळी जगन्नाथ मकर हे नातेवाइकांच्या लग्नासाठी पुण्यातील वाघोली येथे गेले होते. रात्री उशिरा ते ११:३०च्या सुमारास घरी परतले असता, त्यांना पत्नी घरात नसल्याचे आढळले. त्यांनी शेजारच्या बंगल्यात माळीकाम करणारे शेजारी व ड्रायव्हर चंदन यांच्या समवेत बंगल्याच्या परिसरात बॅटरीच्या उजेडात शोध घेतला. बंगल्याच्या मागील कंपाउंडजवळ पाल्यापाचोळ्यात रंजना यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्या डोक्यावर व हातावर जखमा होत्या. मृतदेहाच्या अंगावर एकच वस्त्र होते. त्यामुळे लैंगिक अत्याचार करून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, लैगिंक अत्याचार झाल्याचे खून करणाऱ्याकडून भासविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)मृतदेह सापडल्यानंतर ड्रायव्हर चंदन यांच्याकडे मकर यांनी विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच त्यांच्या हाताला जखमा झाल्या असल्याचे आढळून आल्याने हा खून चालक चंदन यानेच केला असल्याचा आरोप जगन्नाथ मकर यांनी फिर्यादीमध्ये केला होता. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.