शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

कडाचीवाडीत प्रेयसीचा खून

By admin | Updated: February 10, 2015 01:20 IST

कडाचीवाडी (ता. खेड) येथे प्रियकराने लोखंडी हातोडीने प्रेयसीच्या तोंडाचा चेंदामेंदा करून खून केला असून, प्रियकर फरार झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली

चाकण : कडाचीवाडी (ता. खेड) येथे प्रियकराने लोखंडी हातोडीने प्रेयसीच्या तोंडाचा चेंदामेंदा करून खून केला असून, प्रियकर फरार झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली. एका महिन्यात खुनाची ही तिसरी घटना असून, खुनानंतर आरोपी फरार होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी उल्हास सुदाम गोऱ्हे (वय ३० वर्षे, रा. ठाकूर पिंपरी, खेड) हा ड्रायव्हर काम करत असून, कडाचीवाडी येथील गणपती मंदिरामागील युवराज राजाराम कड यांच्या खोलीत गेल्या एक वर्षापासून आपल्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्याला पत्नी व दोन मुले आहेत. प्रेयसीचे नाव अद्याप समजले नसून ती मूळची नागपूरची असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल रात्री काहीतरी कारणावरून प्रेयसी व त्याचे जोरदार भांडण झाले होते. आज सकाळी साडेअकरापर्यंत खोलीचे दार उघडले नाही म्हणून शेजाऱ्यांनी घरमालकाला बोलावले असता खून झाल्याचे उघड झाले. खोलीत रक्ताने माखलेली हातोडी आढळून आली. खून करून आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घरमालक युवराज राजाराम कड (वय ३५ वर्षे रा. कडाचीवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)