शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘ससून’ला विद्यार्थ्यांकडून रक्ताची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:46 IST

ससून रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा असतो. त्यामुळे तेथील नातेवाइकांना इतर ठिकाणाहून रक्त आणण्यासाठी धावपळ करावी लागते.

पुणे : ससून रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा असतो. त्यामुळे तेथील नातेवाइकांना इतर ठिकाणाहून रक्त आणण्यासाठी धावपळ करावी लागते. गेल्या दोन दिवसांत ससूनमध्ये रक्ताची गरज होती. याची माहिती काही विद्यार्थ्यांना मिळाली तेव्हा त्यांनी रक्तदान करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगून रक्तदानही केले. सुमारे ४२ जणांचे रक्त या वेळी संकलित करण्यात आले.ससून रुग्णालयात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्ण येतात. त्यातील अनेकांना रक्ताची गरज भासते. सुमारे पाचशे ते सहाशे जणांना रक्त हवे असते; परंतु ते ससूनच्या रक्तपेढीत मिळत नाही. ससूनमधील रक्तपेढीत संकलित होणाऱ्या रक्तापैकी सुमारे ८० ते ९० टक्के साठा हा थॅलेसेमियाचे रुग्ण, कैदी, गरीब रुग्ण आदींसाठी वापरला जातो. त्यामुळे इतर रुग्णांना रक्ताचा पुरवठा मुबलक होत नाही. परिणामी, दोन दिवसांपूर्वी ससूनमध्ये २५ बाटल्या रक्ताची गरज होती. याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही तरुणांना समजली. त्यांनी त्वरित ससूनच्या रक्तपेढीशी संपर्क साधून ‘आम्ही रक्तदान करायला तयार आहोत,’ असे सांगितले. तेव्हा ससून रक्तपेढीने विद्यापीठातच शिबिर आयोजित केले. या वेळी सुमारे ४२ जणांचे रक्त संकलित केले.भारतीय विद्यार्थी काँग्रेस व ससून रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबिर झाले. सतिश पवार व मोहिनी जाधव या दोघांनी पुढाकार घेतला. तसेच या वेळी भूषण राणभरे, रोहन शेट्टी, अमीर पठाण, संतोष डोंगरे, मान पाटील, उमेश कुंभार, रुकसना शेख, अर्चना डुमुरे, राहुल थिटे आदींनी सहकार्य केले.