लोकमत व जय हरी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे दीपप्रज्वलन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, केइएम् हॉस्पिटल व पुना हॉस्पिटलचे कन्सल्टंट डॉ. कल्याण गंगवाल, शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी, लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित, पुणे वनसंरक्षक अधिकारी रंगनाथ नाईकडे, ह. भ.प. समाधान महाराज शर्मा, महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ राज्य कार्यकारिणी सदस्य अजित वडगांवकर, पोलीस उपनिरीक्षक शेख, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, शुभांगी कम्युनिकेशनचे संचालक पप्पूशेठ भळगट, आळंदी चऱ्होली डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. विकास पाटील, जय हरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गव्हाणे आदींच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, नगरसेवक सचिन गिलबिले, युवानेते मयुर मोहिते, अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, नंदकुमार वडगांवकर, डॉ. नितिनकुमार जाधव, ऍड. किरण दौंडकर, उद्योजक रमेश गोडसे, आयडियल फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश मोहिते, गोपालक सचिन महाराज गुरव, ह.भ.प. गंभीर महाराज, विशाल दौंडकर, गणेश दौंडकर आदींसह जय हरी सोशल फाउंडेशनचे सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान ३७ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील तर वनसंरक्षक अधिकारी रंगनाथ नाईकडे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
--
चौकट :
'ती'च्या रक्तदानाने सुरुवात...
आळंदीत पूर्वा राजू शिंदे या अठरा वर्षीय तरुणीने सर्वप्रथम दक्तदान करून शिबिराचा 'श्री गणेशा' केला. तर शेलपिंपळगाव येथील शिवांजली अविनाश मोहिते यांनी सहाव्यांदा रक्तदान करून 'रक्ताचं नातं' जोपासलं आहे. महिलांनीही शिबिरात सहभागी होत प्रतिसाद दिला.
--
फोटो क्रमांक :
फोटो ओळ: आळंदीत (ता. खेड) रक्तदान शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवर.
२) आळंदीत तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले. (छाया : भानुदास पऱ्हाड)