लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्मांण झाला. अनेक गुरजुंना वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या जीवावर बेतले. कोरोनाची तिसरी लाट बघता त्याला सामोरे जाण्यासाठी आताच तयारी करायला हवी. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करायला हवे. लोकमतने स्व. जवाहरलालजी दर्डा(बाबुजी) यांच्या स्मरनार्थ ‘रक्ताच नातं’ हा उपक्रम स्तूत्य आहे. रक्तदानाचा हा महामेरू संपूर्ण राज्यभरात आज राबविला जात आहे. यातून गरजुंना तातडीने रक्त उपलब्ध होईल असा विश्वास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यलय, महसुल विभाग आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी रक्ताचं नात या उपक्रमा अंतर्गत ‘रक्तदान महायज्ञ’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, तिन्ही विभागागील अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून रक्तदान केले. ४० रक्तदात्यांनी या वेळी रक्तदान करत या मोहिमेला हातभार लावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार वल्लभ बेनके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काका काकडे, कृषी व बांधकाम सभापती बाबुराव वायकर, समाजकल्याण सभापती सारीका पानसरे, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, कृषी अधिकारी अनिल देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराला उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना रक्तदान करण्यास प्रेरीत केले.
जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या शिबिरास भरपुर प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रक्तदान करन्यासाठी कर्मचारी आले होते. त्यांना अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार वल्लभ बेनके आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पाच वाजेपर्यंत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यलय आणि महसूल विभागातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिबिरात येऊन रक्तदान केले. अनेकांचे हिमोग्लोबिन कमी असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. जवळपास ३० जणांना काही कारणांमुळे रक्तदान करता आले नाही.
चौकट
मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावला हक्क
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी रक्तदान करत कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला अनेक कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
चौकट
कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले लोकमतचे आभार
कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले. त्या काळात मदत करण्याची इच्छा असतांना आम्हाला करता आली नाही. जिल्हा परिषदेतच रक्तदान शिबिर आयोजित करण्याची आमची इच्छा होती, मात्र योग येत नव्हता. लोकमतने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या शिबिरामुळे आम्हाला रक्तदान करण्याची संधी मिळाली. यामुळे आम्ही लोकमतचे आभारी आहोत, अशी भावना रक्तदात्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.