शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियम पाळूनच रक्तदान, आरोग्य शिबिरे करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST

खेड पोलीस ठाणे व पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष यांची बैठक सिद्धेश्वर मंगल कार्यालयात घेण्यात ...

खेड पोलीस ठाणे व पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष यांची बैठक सिद्धेश्वर मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव बोलत होते. या वेळी राज्य पोलीस संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील, शिवसेना महिला अघाडीच्या विजया शिंदे, दक्षता कमिटीचे अध्यक्षा मनीषा टाकळकर, गोपनीय विभागाचे संदीप भापकर, अर्जुन गोडसे, अमर टाटीया यांच्यासह सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.

कोरोना संकटामुळे गणेशोत्सवावरही आता काही निर्बंध आले आहेत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तो शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. तालुक्यात व राजगुरूनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, गणेशोत्सव काळात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. शासनाने सूचित केलेल्या निर्देशांचे पालन करून, मूर्तीची उंची, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करावे. डीजे वाजवू नये, वर्गणीची सक्ती करु नये, एक गाव गणपती उपक्रम राबवावेत, कोरोनाचे नियम पाळून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर राबवावीत विसर्जन मिरवणुकीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना येण्यास परवानगी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करावी व नागरिकांना आव्हान करावे, शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून करावे.