शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी वडिलांचा मुलाकडून खून

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

दारूच्या नशेत पत्नी आणि मुलाला सतत शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हडपसर येथील

पुणे : दारूच्या नशेत पत्नी आणि मुलाला सतत शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या वडिलांचा रागाच्या भरात मुलाने गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हडपसर येथील माळवाडी भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय शंकर वेताळ (वय ४२, रा. भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सागर (वय २४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर नवनाथ शंकर वेताळ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ यांचा हडपसर भाजी मंडईमध्ये गाळा आहे. त्यांचा मोठा भाऊ दत्तात्रय व विठ्ठल माळवाडी भागात शेजारी राहण्यास आहेत, तर त्यांची चुलतीही तेथेच शेजारी राहते. सुरुवातीला हडपसर जकातनाका येथे मिळेल ते काम, तसेच हमाली करणारे दत्तात्रय अलीकडे जास्त प्रमाणात दारू प्यायला लागले होते. तसेच कोणताही कामधंदा करीत नव्हते. त्यांचा मुलगा सागर अ‍ॅमेनोरा मॉलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो, तर सुनंदा या अ‍ॅमेनोरामध्ये साफसफाईची कामे करतात. दत्तात्रय त्यांच्या पत्नी व मुलाला दारू पिऊन नेहमी त्रास देत असत. त्यामुळे त्यांच्यात सतत वादविवाद व्हायचे. गुरुवारी रात्री दत्तात्रय यांनी दारू पिऊन पत्नीस शिवीगाळ करीत मारहाण केली होती. त्यानंतर शुक्रवारीही शिवीगाळ केली. त्यामुळे सागर आणि त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली. चिडलेल्या सागरने त्यांचा गळा दाबून खून केला. हडपसर पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले आहे.