शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून खून

By admin | Updated: March 13, 2016 01:07 IST

मोशीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रथमेश अजिनाथ पगारे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, मोशी) या तरुणाचा मृतदेह वढू-तुळापूर येथील नदीपात्रात आढळून आला

पिंपरी : मोशीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रथमेश अजिनाथ पगारे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, मोशी) या तरुणाचा मृतदेह वढू-तुळापूर येथील नदीपात्रात आढळून आला.अपहरण करून डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अजय राठोड (वय १९, रा. नारायणगाव), धीरज बाबूराव कुदळे (वय २०, मोशी, शिवाजीनगर ) या दोन आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रथमेश हा मोशीतील लक्ष्मीनगरमध्ये राहत होता. मोशी यात्रेच्या दिवशी रात्री १२च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यास मोबाइलवरून संपर्क साधला. तो घराबाहेर पडला. सकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद नोंदवली होती. पोलिसांनी प्रथमेशच्या मोबाइलवर कॉल केलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, शनिवारी पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)आरोपींपैकी अजय राठोडचे चार महिन्यांपूर्वी प्रथमेशबरोबर भांडण झाले होते. प्रथमेशने अजयला मारहाण केली होती. त्यानंतर अजय नारायणगावला निघून गेला होता. काही दिवसांनी तो मामाला घेऊन प्रथमेशकडे झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यास आला होता. त्या वेळीसुद्धा प्रथमेशने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून अजयने धीरज कुदळे या साथीदाराच्या मदतीने अपहरण करून प्रथमेशचा खून केला.