शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शंभराच्या नव्या नोटेची नाकाबंदी

By admin | Updated: November 16, 2016 03:34 IST

शहरात नव्या शंभराच्या नोटेचा पुरवठा बँकांना अत्यंत अल्प स्वरूपात होत असल्याने बहुतांश बँकांमध्ये शंभराच्या चलनाचा तुटवडा निर्माण झाला

पुणे : शहरात नव्या शंभराच्या नोटेचा पुरवठा बँकांना अत्यंत अल्प स्वरूपात होत असल्याने बहुतांश बँकांमध्ये शंभराच्या चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सुट्ट्यासाठी नागरिकांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना बळी पडावे लागत असल्याचे चित्र होते. त्यातच बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांनाच कमी पैसे आल्याने त्याच्याशी संलग्न असलेल्या सहकारी बँकांनाही कमी निधीचा पुरवठा झाल्याची माहिती राष्ट्रीयीकृत बँकांतील अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील अनेक एटीएम केंद्र मंगळवारीदेखील बंद होती. रक्कम असणाऱ्या एटीएममध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विविध बँकांच्या शाखांमध्येही जुन्या एक हजार व पाचशेच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. काही बँकांमध्ये केवळ दोन हजाराच्याच नोटा असल्याने, ग्राहकांना चार हजार रुपये देण्यात येत होते. शंभराच्या सुट्ट्या नोटा नसल्याने बँक कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. काही बँकांनी आपल्या कॅश काऊंटरची संख्या एक अथवा दोनने वाढविली आहे. चलन रद्दचा निर्णय झाल्यानंतर मंगळवारी प्रथमच अत्यल्प रक्कम वितरणासाठी आल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरासरी विविध बँकांमध्ये होणाऱ्या रोख व्यवहारांमध्ये जवळपास १५ पट वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत मंगळवारी केवळ २० टक्केच रकमेचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनाच कमी रक्कम प्राप्त झाली. त्याचा परिणाम एटीएम केंद्रांवरील रक्कमेवरदेखील झाला. परिणामी राष्ट्रीयीकृत बँकांशी संलग्न असलेल्या बँकांना मागणीच्या तीस टक्के रकमेचाच पुरवठा करण्यात येत होता. बँकांकडे असलेल्या जुन्या शंभराच्या नोटादेखील वाटून संपल्या आहेत. त्यामुळे शंभराच्या नोटेचा पुरवठा न वाढल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता अधिकारी वर्तवित आहेत. दरम्यान, वाढत्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी काही बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांकडून समुपदेशन केले जात आहे. तर गर्दीतील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी चहापान, बिस्किटांची सोयदेखील काही बँकांत करण्यात आली आहे. या शिवाय ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्य दिले जात असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)