शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकार रोखण्यासाठी ‘नाकाबंदी’ तुरळकच

By admin | Updated: February 20, 2017 03:24 IST

महापालिका निवडणुकीच्या प्रचारातच उडालेला पैशाचा धुरळा आणि पुण्यातील राजकीय चुरस पाहता मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होणार

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारातच उडालेला पैशाचा धुरळा आणि पुण्यातील राजकीय चुरस पाहता मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होणार असल्याची शक्यता सर्वांकडूनच वर्तविण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून नाकाबंदी तुरळक ठिकाणीच करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत नाकाबंदीचे नियोजनही पोलिसांनी केले होते. मात्र, मधल्या काळात हे प्रकार घडल्यास काय? हा प्रश्न निर्माण झाला. जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली़ ‘लोकमत’च्या टीमने रविवारी रात्री शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोटारीतून केलेल्या पाहणीत पोलिसांची नाकाबंदी तुरळक ठिकाणीच आढळून आली. सोमवारी आणि मंगळवारी ड्राय ड्रे असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील वाईन शॉपच्या बाहेर मद्य खरेदीसाठी गर्दी उसळलेली दिसून आली़नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि विधान परिषद निवडणुकीच्या काळात पोलीस व महसूल विभागाने जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली होती़ त्यात अनेक वाहनांमधून पैशांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले होते़ या तपासणीत सापडलेल्या नोटा जप्त करून त्याची माहिती आयकर विभाग व निवडणूक आयोगाला देण्यात आली होती़ सध्या जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत़ प्रचाराच्या या काळात मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर सुरू असल्याचे सांगितले जाते़ मात्र, तपासणीमध्ये पैशांची वाहतूक करताना पकडल्याच्या घटना अद्याप समोर आलेल्या नाहीत. रविवारी प्रचाराची मुदत संपली असून, मंगळवारी मतदान होणार आहे़ या मधल्या काळात मतदारांना प्रलोभने दाखविली जातात़ त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलीस दलाकडून शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात खरोखरच नाकाबंदी करण्यात येत आहे का?, वाहनांची तपासणी केली जात आहे का? याची पाहणी ‘लोकमत’च्या टीमने रविवारी रात्री केली़ बाणेर, बालेवाडी, मुंबई- बंगळुरू महामार्ग, कोथरूड, वारजे, सातारा रस्ता, सहकारनगर, स्वारगेट, सिंहगड रस्त्यावर ही पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान राजाराम पुलावर एकाच ठिकाणी बॅरिकेटिंग करून नाकाबंदी करण्यात आलेली होती. याठिकाणी चारचाकी आणि दुचाकींची तपासणी करण्यात येत होती. राजकीय पक्षाचे फलक हटवले४बाणेर येथे उमेदवारांनी सुरू केलेल्या निवडणूक कार्यालयांवरील पक्षांचे फलक उतरवण्यात आले होते. मात्र, मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधून दिले जात होते़ तसे फलकही तेथे लावण्यात आले होते. जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही ‘सेवा’ सुरू केली होती. ४मतदारांकडून नाव व मोबाईल नंबर लिहून घेतला जात होता़ त्याच वेळी मतदान यंत्राच्या प्रतिकृतीवर उमेदवाराचा अनुक्रमांक, चिन्ह याची माहिती मतदारांना दिली जात होती. अशा प्रकारे कार्यकर्त्यांकडून छुपा प्रचारही सुरू होता.४पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना रात्री अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत नाकाबंदी आणि कोंबिंग आॅपरेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, रात्री उशिरा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले. सोमवारी सकाळी मतदानयंत्र वाटपापासून त्यांच्या बंदोबस्ताला सुरुवात होणार आहे.