शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री दहानंतर शहरात नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गौरीबरोबरच पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारपासून रस्त्यावरील गर्दी वाढली असल्याने रात्री दहानंतर शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गौरीबरोबरच पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारपासून रस्त्यावरील गर्दी वाढली असल्याने रात्री दहानंतर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची गर्दी अधिक होत असल्याने या भागात रात्री दहानंतर कडक नाकाबंदी केली जाऊ लागली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात कडक नाकाबंदी करण्यात येणार असून, दहानंतर स्थानिक रहिवासी व वैध कारणाशिवाय फिरणाऱ्यांव्यतिरिक्त इतरांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

प्रशासनाकडून गणेशोत्सवकाळात मध्यवर्ती भागात गर्दी करू नका, असे आवाहन केले जात असताना मध्यवर्ती भागात गर्दी होत आहे. याच कारणास्तव शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद ठेवला जात आहे. मध्यवर्ती भागातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. ही गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून आता कडक नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विनाकारण फिरणाऱ्यांकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी पॉईंट करण्यात आले असून, प्रत्येक नाकाबंदी पाॅईंटवर दहानंतर विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. शहरातील टिळक रोड वाहतुकीसाठी मोकळा असणार असून शहरातील मध्यवर्ती भागात जाताना मात्र नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे.

शिवाजी रोड, बाजीराव रोडवरील वाहतूक बदल

मंगळवारी सायंकाळपासून पीएमपी बस तसेच जड वाहनांना स. गो. बर्वे चौकातून स्वारगेटच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्तामार्गे पुढे जावे. स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पुरम चौकातून वळविण्यात येईल. वाहने स्वारगेट, सारसबाग, पूरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जाता येईल. नगर रस्त्यावरून स्वारगेट कात्रजला जाण्यासाठी पुणे स्टेशन येथून नेहरू रस्त्याने सेव्हन लव्ह चौकातून स्वारगेटकडे किंवा मार्केट यार्डकडे जाता येईल.

.....

शहरातील मध्य वस्तीत भाविकांची गर्दी वाढू लागल्याने मंगळवारी रात्री दहानंतर या परिसरात नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून त्यांना परत पाठविण्यात येत आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर घोळक्याने फिरू नये.

- प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, पुणे