शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: March 14, 2016 01:19 IST

अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नसरापूर व परिसरातील नागरिकांना राजगड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाजारपेठेत मोकळा श्वास घेता आला

नसरापूर : अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नसरापूर व परिसरातील नागरिकांना राजगड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाजारपेठेत मोकळा श्वास घेता आला. सक्षम अधिकाऱ्याने मनात आणल्यानंतर काय बदल होऊ शकतो, याचा प्रत्यय आज नसरापूरकरांना आला. पोलिसांच्या या प्रयत्नाला आज कोंडी सोडविण्यात यश आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.नसरापूर बाजारपेठेत अनेक वर्षांपासून वाहतुकीची कोंडी व समस्या मोठ्या प्रमाणात आ वासून उभ्या आहेत. वाहतुकीची समस्या ग्रामस्थ व पोलिसांच्या माध्यमातून अनेक वेळा सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यात नेहमी अपयशच पदरात पडते. शनिवारी (दि. १२ रोजी) नसरापूर बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थ व राजगड पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या वेळी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्याचे नवनियुक्तपोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, उपसरपंच सुमन घाटे, ग्रा.पं.सदस्य संदीप कदम, विक्रम कदम, आजी-माजी सरपंच, पदाधिकारी, व्यापारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच राजगड पोलीस नसरापूर बाजारपेठेत येऊन संबंधितांशी संवाद साधत अडथळे दूर करीत होते. नसरापूरकरांबरोबर झालेल्या बैठकीची अंमलबजावणी पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी केलेल्या आवाहनाला ताबडतोब प्रतिसाद देऊन नसरापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वत:हून अडथळे दूर केले; मात्र तरीही वाहतुकीची समस्या बेजबाबदार वाहनांमुळे सुटू शकली नाही. याकरिता संबंधित बैठकीचे आयोजन पोलिसांनी केल्याचे समजते. (वार्ताहर)