शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

क्लीनिंगचे काम करताना स्फोट

By admin | Updated: May 30, 2017 02:12 IST

चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये असणाऱ्या कॉर्निंग कंपनीच्या जवळच्या चौकात एचपीसीएल गॅस वाहिनीच्या क्लीनिंगचे

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये असणाऱ्या कॉर्निंग कंपनीच्या जवळच्या चौकात एचपीसीएल गॅस वाहिनीच्या क्लीनिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. भर वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला अपघात झाला असला तरी सुदैवाने त्यात अन्य कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. यापेक्षा भयानक म्हणजे या ठिकाणी काम करणारे कामगार कुठल्याही सुरक्षा साधनाविना काम करीत होते. यावरून कामगारांची काम करण्याच्या ठिकाणची असुरक्षितता समोर येत आहे.या याठिकाणी काम करणारे कामगारदेखील कुठल्याही सुरक्षेविना काम करीत असल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळाले. काम करणाऱ्या नागरिकांना ना हेल्मेट होते ना सुरक्षा जॅकेट. त्यामुळे औद्योगिक भागात कामगार किती धोकादायक परिस्थितीत काम करतात याचा अनुभव येतो. आणि सर्वात धोकादायक म्हणजे या ठिकाणी खोदकाम करताना २२ केव्ही क्षमतेची वीज वाहिनी करणारी केबल यावेळी कट झाल्याने मोठा अपघात घडला नाही हे काम करणारांचे भाग्य ठरले. वराळे गावच्या हद्दीत कॉर्निंग कंपनीच्या चौकात गॅसवाहिनीचे काम सुरू आहे. भांबोली गावाकडून ही गॅसवाहिनी आली आहे. एचपीसील कंपनीच्या अंतर्गत आम्ही काम करीत आहे. आज क्लीनिंग करीत असताना पुशिंग करते वेळी ही घटना घडली आहे. परंतु यापुढे काम करताना आम्ही काळजी घेऊ.- एस. वडीवेलन, अ‍ॅडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी आज सकाळी या ठिकाणी गॅसवाहिनी क्लीनिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या झालेल्या स्फोटामुळे त्या ठिकाणी खोदकाम करून काढण्यात आलेल्या मुरूम, माती मोठ्या प्रमाणात उडाली आणि आजूबाजूच्या परिसरात पसरली. धुळीचे लोटदेखील मोठ्या उंचावर उडाले होते. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आजूबाजूच्या हॉटेलमध्ये देखील दगडाचे खडे आणि माती होती. या वेळी झालेल्या प्रचंड मोठ्या आवाजाने आणि स्फोटाच्या धक्क्याने जवळच्या हॉटेलमध्ये खेळत असणारा लहान मुलगा खाली कोसळला आणि यात किरकोळ जखमी झाला. उडालेले दगड या वेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांनादेखील लागले.