शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडे काळा पैसा येणार कुठूून?

By admin | Updated: November 14, 2016 06:51 IST

काळ्या पैशाविरोधात करण्यात आलेली कारवाई योग्य आहे, परंतु याचा शेतकऱ्यांना उपयोग झाला तर अधिक प्रभावी होऊ शकेल. आजच्या व्यवस्थेमुळे

पुणे : काळ्या पैशाविरोधात करण्यात आलेली कारवाई योग्य आहे, परंतु याचा शेतकऱ्यांना उपयोग झाला तर अधिक प्रभावी होऊ शकेल. आजच्या व्यवस्थेमुळे आणि व्यवस्थेतील चुकांमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसाच राहत नाही, तर काळा पैसा कुठून येणार? असा प्रश्न अभिनेते, नाम फाउंशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित केला़ भ्रष्टाचाऱ्याचा काळा पैसा शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या भरीव सामाजिक कार्यासाठी नाम फाउंडेशनला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला़ त्यावेळी ते बोलत होते. कोहीनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, मयूरेश वैद्य, नैनिश देशपांडे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांनी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली.अनासपुरे म्हणाले, ‘‘भरपूर पाऊस झाला म्हणून आता शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असे होणार नाही. चुकीची धोरणे आणि त्याची चुकीची अंमलबजावणी यामुळे वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे. साहेबी संस्कृतीमुळे व्यवस्था शेतकऱ्यापासून लांब गेली. या साहेबी संस्कृतीनेच शेतकऱ्यांची आज अवस्था वाईट झाली आहे़ शेतकऱ्यांच्या समस्या तात्कालिक नाहीत. त्यामुळे त्याच्यावर केवळ मलमपट्टी करणारे तत्कालिक उपाय करुन चालणार नाहीत, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे. नामच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न करीत आहोत. हे काम करताना आम्ही साहेबी संस्कृती लांब ठेवली. आम्हाला आमच्या या कामाचे क्रेडिट नको, आम्ही इतरांसारखेच सर्वसामान्य आहोत, आम्हाला कोणीही देवदूत समजू नये.’’