लासुर्णे: बेलवाडी (ता. इंदापूर) येथील शारदा महिला संघ व सुनंदा पवार यांच्या विशेष सहकार्यातून ब्लॅक गोल्ड केस संकलन केंद्र सुरू करण्यात आले.
येथील गावात मयूरेश्वर बचत गटाने केस संकलन केंद्र सुरू केले असून, महिलांच्या केसाचा गुंता ३ हजार ५०० किलोने खरेदी केला जाणार आहे. केस संकलनाचे किशोर खोत व सुभाष काम पाहणार आहेत. अनेक महिला केसाचा गुंता इकडेतिकडे फेकून देतात अथवा साठून नाममात्र किंमत देऊन भांडी घेतली जातात. पण आता याला चांगली किंमत मिळणार आहे. म्हणून महिलांनी आपल्या केसाचा गुंता फेकून न देता ते सोन्या प्रमाणेच जपून ठेवावे. ज्या ठिकाणी बचत गटाने केस संकलन सुरू केलेले आहे. त्या केंद्रामध्ये जमा करून त्याची किंमत घेऊन जावी, हा एक वेगळा अनुभव असून यातूनही काही महिलांना टाकाऊचे पैशे मिळतील, तसेच केंद्र चालवणाऱ्या महिलांना रोजगार निर्माण होईल. तसेच गावातील अनेक महिला समजतील की या केसाचे पुढे काय होणार? तर त्यावर प्रक्रिया करून केसरोपण तसेच सुशोभीकरणासाठी तसेच लिक्विड बनवण्यासाठी हे एक्सपोर्ट केले जाते.
बाहेरील राज्यात अनेक व्यापारी खरेदी करीत आहेत भविष्यात सर्व माहिती घेऊन आपणास शक्य झाल्यास अशा प्रोसेसिंग युनिटबाबत विचार करणार आहोत, असे सुनंदा पवार यांनी संपर्क साधला असता सांगितले. या वेळी बचत गटाचे समन्वयक बाळासाहेब नगरे, ग्रामसेवक मृगेन्द्र करचे, उपसरपंच स्वाती पवार, तात्यासो शेलार, तसेच बचत गटाचे सुरेखा शिंदे, सुरबला जामदार, मंजुश्री जामदार, अर्चना पवार, संजना जामदार, नीलम शेळके, आरती जाधव, मीनाक्षी शेळके, संगीता गोरे, मयूरी काशीद, संगीता पवार आदी उपस्थित होते. सर्वांनी चर्चेतून गटाचे उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध चर्चा केली व मयूरेश्वर बचत गट केस संकलन केंद्र सुरू केले. या वेळी १.५ किलो केसाचे संकलन केले.
बेलवाडी येथे शारदा महिलासंघ व सुनंदा पवार यांच्या विशेष सहकार्यातून ब्लॅक गोल्ड केस संकलन केंद्र सुरू करण्यात आले.
०५०९२०२१-बारामती-०२