शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची छत्री दुरुस्तीसाठी काँग्रेस भवनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

पुणे: काँग्रेस भवनमध्ये शहर काँग्रेसने सुरू केलेल्या ''विनामूल्य छत्री दुरूस्ती'' उपक्रमावरून बरीच राजकीय खिल्ली उडवली गेली, पण या केंद्रात ...

पुणे: काँग्रेस भवनमध्ये शहर काँग्रेसने सुरू केलेल्या ''विनामूल्य छत्री दुरूस्ती'' उपक्रमावरून बरीच राजकीय खिल्ली उडवली गेली, पण या केंद्रात भारतीय जनता पार्टीचा शिक्का असलेली एक तुटकी छत्री शुक्रवारी दुरुस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली.

काँग्रेसच्या विनामूल्य छत्री दुरुस्तीची समाजमाध्यमांवर गेले काही दिवस बरीच टर उडवली जात आहे. ''७० वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ'', ''आता भाजपाची काही धडगत नाही'' अशा आशयाच्या पोस्ट केल्या गेल्या. त्यात अर्थातच भाजप समर्थक आघाडीवर होते.

पण शुक्रवारी या केंद्रात एका नागरिकाने भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली एक तुटकी छत्री दुरुस्तीला म्हणून आणून दिली. तिची रंगसंगती भाजपाच्या झेंड्याप्रमाणे आहे. त्यावर कमळाचे चिन्हही आहे. शनिवारपेठेतील एका आजोबांनी ती आणून दिली व दुरुस्त करून मागितली. काँग्रेसच्या सोशल मिडिया आघाडीचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांच्या नजरेस ती पडली व त्यांनी लगेचच हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला. त्यानंतर मग हे छायाचित्र समाजमाध्यमांवर दिवसभर फिरत होते.

छत्री दुरुस्त करणारे रोहिदास कांबळे यांनी सांगितले की छत्रीच्या काड्या तुटल्या होत्या. कापड साधे असल्याने विरले आहे. बहुधा ती वाटपातील असावी. मी ती दुरुस्त करून दिली.