शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चिंचवडला भाजपचा जोर; लक्ष्मण जगताप बाजीगर

By admin | Updated: October 19, 2014 23:53 IST

चिंचवड विधानसभा निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा दणदणीत विजय झाला

पिंपरी : चिंचवड विधानसभा निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा ६० हजार २९७ मतांनी पराभव केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असूनही या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष डिपॉझिट वाचवू शकला नाही. काँग्रेस व मनसेचे उमेदवार अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फेकले गेले.चिंचवड विधानसभेची निवडणूक उमेदवारीपासून मतदानापर्यंत विविध राजकीय घडामोडींनी लक्षवेधी ठरली होती. या मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख पक्षांचे आठ व सोळा अपक्ष रिंगणात होते. त्यात भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे, काँग्रेसचे कैलास कदम, मनसेचे अनंत कोऱ्हाळे, अपक्ष मोरेश्वर भोंडवे अशी लढत दिसून येत होती. मात्र, निकालावरून तिरंगी लढत झाल्याचे दिसून आले. बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुलात मतमोजणी झाली. त्या वेळी केंद्राबाहेर तसेच क्रीडा संकुलाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. निवडणूक विभागाचे प्रतिनिधी, प्रमुख पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी सज्ज होते. पोलिंग एजंटमध्ये कमालीची उत्सुकता होती. कागद-पेन आणून केंद्रानुसार आकडेवारी लिहून घेण्याची उत्सुकता दिसून येत होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आमदार लक्ष्मण जगताप आघाडीवर होते. २४ व्या फेरीपर्यंत ते आघाडीवरच राहिले. सकाळी नऊला पहिल्या फेरीचा निकाल लागला. २ हजार १८८ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर सहाव्या फेरीत १२ हजार १२२ मतांची आघाडी, दहाव्या फेरीत १५ हजार १५७ मतांची आघाडी मिळाली. तेराव्या फेरीत हा आलेख खाली आला. जगतापांना १४ हजार ६१४ मतांची आघाडी मिळाली.एकेका फेरीचा निकाल हाती येत असताना सर्वच भागातून मिळणारे मताधिक्य पाहून जगतापसमर्थकांचा उत्साह वाढत असल्याचे दिसून येत होते. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा एकेका फेरीनुसार उत्साह कमी होत चालला होता. सोळाव्या फेरीत २४ हजारांची आघाडी मिळाली. विसाव्या फेरीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचे प्रतिनिधी आणि स्थानिक नेते एकेक करून गायब होऊ लागले, तर जगताप समर्थक एकमेकांना टाळ्या देऊन आनंद व्यक्त करीत होते. एकविसाव्या फेरीत ४४ हजार ६६७, पंचविसाव्या फेरीत ६० हजार १२१ ची आघाडी मिळाली. टपाली मतदान मोजले. ६८९ मतांपैकी जगताप यांना ३३५ मत आणि कलाटे यांना १५९ मते मिळाली. पोस्टल मतांत जगताप यांना १७६ मतांची आघाडी होती. पोस्टल मतांसह जगताप यांना ६० हजार २९७ची आघाडी मिळाली. दुपारी अडीचला मोजणीची शेवटची फेरी संपली. मात्र, अधिकृत निकाल तीनला जाहीर केला. दुपारी अडीचला निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी जगताप यांना प्रमाणपत्र दिले. कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. त्यानंतर आमदार जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी भाजपचे सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, नगरसेविका सीमा सावळे, सारंग कामतेकर, संजय जगताप, मोरेश्वर शेडगे, धनराज बिर्दा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)