शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गाफील काँग्रेसवर भाजपाचा डाव

By admin | Updated: February 25, 2017 02:43 IST

प्रभाग क्रमांक १९ मधील ब आणि क या दोन जागांवरचा भाजपाच्या महिला उमेदवारांचा विजय काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

राजू इनामदार , पुणे पुणे : प्रभाग क्रमांक १९ मधील ब आणि क या दोन जागांवरचा भाजपाच्या महिला उमेदवारांचा विजय काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. सगळी मते आपलीच, पूर्ण पॅनेल येणार या समजुतीत असणाऱ्या दोन्ही काँग्रेसला मतदारांनी दोन वेगळे व तेही भाजपाचे चेहरे देऊन चांगला धडा शिकविला आहे. तुम्ही सांगाल ते होणार नाही, आम्हाला वाटेल तेच होईल, असेच दोन काँग्रेस व दोन भाजपा असा निकाल देऊन मतदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादीलाही बजावले. झालेले मतदान पाहिले तर मतदारांनी किती चाणाक्षपणे निर्णय दिला हे लक्षात येते. अ गटात काँग्रेसच्या अविनाश बागवे यांना १४ हजार ५७८ मते मिळाली व ते विजयी झाले. ब गटात विजयी झालेल्या भाजपाच्या मनीषा लडकत यांना १२ हजार ९३४ मते मिळाली. क गटातील भाजपाच्याच अर्चना पाटील यांच्या पारड्यात १० हजार ४१८ मते पडली. ड गटात काँग्रेसचे रफिक अब्दूल शेख ८ हजार ९३८ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका हिना मोमिन या ब गटात उमेदवार होत्या. बागवे व रफिक अब्दूल शेख यांच्या जोडीने काँग्रेसच्याच महिला उमेदवार येणे अपेक्षित होते. पण मतदारांनी प्रत्यक्षात त्यांना नाकारले व भाजपाच्या दोन महिला उमेदवारांना संधी दिली. या भागातून पालिकेसाठी भाजपाचे उमेदवार निवडून येतील यावर भाजपाचाही विश्वास नसेल, पण मतदारांनी हे क्रॉस व्होटिंग विचारपूर्वक झालेले आहे, असेच काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांमधील विरोधाभास पाहता म्हणावे लागेल. कारण राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका हिना मोमिन व त्यांच्या अन्य तीन उमेदवारांना मतदारांनी विचारातही घेतलेले नाही, असे त्यांच्या मतांच्या संख्येवरून दिसते.