शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवत ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST

-- यवत : यवत ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत कुल गटाने थोरात गटाचे दोन सदस्य गळाला लावून ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता ...

--

यवत : यवत ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत कुल गटाने थोरात गटाचे दोन सदस्य गळाला लावून ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापन केली आहे. सरपंचपदी समीर दोरगे तर उपसरपंचपदी सुभाष यादव यांची निवड झाली आहे.

सरपंच पदाच्या निवडणुकी वेळी थोरात गटाचे समीर दोरगे व इम्रान तांबोळी हे दोन सदस्य कुल गटात सामील झाल्याने कुल गटाचे संख्याबळ १० तर थोरात गटाचे संख्याबळ ७ झाले होते.निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम शेंडगे , कैलास भाटे यांच्या उपस्थितीत आज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.

यावेळी कुल गटाच्या वतीने सरपंच पदासाठी समीर दोरगे व उपसरपंच पदासाठी सुभाष यादव यांनी अर्ज दाखल केले होते तर थोरात गटाच्या वतीने सरपंच पदासाठी सदानंद दोरगे व उपसरपंच पदासाठी सुजाता कुदळे यांनी अर्ज दाखल केले होते.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य नाथदेव दोरगे, लंका कोळपे , गौरी दोरगे , समीर दोरगे , इम्रान तांबोळी , मंगल खेडेकर , सुभाष यादव , उज्वला शिवरकर , गौरव दोरगे , राजेंद्र शेंडगे , मंदाकिनी कुदळे , मनोहर खुंटवड , कोमल कदम , मनीषा रायकर , सदानंद दोरगे , सुजाता कुदळे , नंदा बिचकुले उपस्थित होते.

सरपंच पदाच्या निवडणुकीत समीर दोरगे यांना ९ तर सदानंद दोरगे यांना ८ मते मिळाल्याने समीर दोरगे एका मताने विजयी झाले.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सुभाष यादव यांना १० तर सुजाता कुदळे यांना ७ मते मिळाल्याने सुभाष यादव तीन मतांनी विजयी झाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीच्या लढतीत थोरात गटाने सलग तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवून हैट्रिक साधली होती .१७ पैकी ९ जागांवर थोरात गट तर ८ जागांवर कुल गटाने बाजी मारल्याने परत एकदा काठावरचे बहुमत थोरात गटाला मिळाले होते.मात्र सरपंच पदाच्या निवडीत आमदार राहुल कुल यांनी राजकीय चातुर्य दाखवत थोरात गटाला चितपट केले .

दौंड तालुक्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेली यवत ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी थोरात व कुल गटात मोठी चुरस होती. सरपंचपदाच्या निवडी वेळी देखील मोठ्या राजकीय उलथापालथ झाल्याने संपूर्ण तालुक्यात यवत मधील निवडीची चर्चा होती.

सरपंचपदाच्या निवडणुकी अगोदर मोठ्या राजकीय उलथापालथ झाल्याने गावात तणावाचे वातावरण होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी विशेष काळजी घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच निवडनूक झाल्यानंतर देखील गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

--

चौकट

ऐनवेळी दोन सदस्य कुल गटाच्या गळाला

--

ऐन सरपंच पदाच्या निवडी वेळी थोरात गटाचे दोन सदस्य कुल गटाच्या गळाला लागले. थोरात गटाकडून निवडून आलेल्या समीर दोरगे यांना कुल गटाकडून सरपंच पदाची संधी देण्यात आली.या सर्व घडामोडी करताना आमदार राहुल कुल , भीमा पाटस कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कुल गटाने सर्व शक्ती पणाला लावली.थोरात गट मात्र यावेळी गाफील राहिल्याने बहुमत असूनही सत्ता मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले तर भाजपची सत्ता स्थापन झाली.

--

फोटो क्रमांक झ १०यवत ग्रामपंचायत

फोटो ओळ :- यवत ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी समीर दोरगे व उपसरपंच पदी सुभाष यादव यांनी निवड झाल्यानंतर सत्कार करताना आमदार राहुल कुल , यावेळी उपस्थित सुरेश शेळके , माऊली ताकवणे