शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची पहिली यादी आज ?

By admin | Updated: February 1, 2017 05:07 IST

महापालिका निवडणुकीसाठी पुण्यातील भाजपाच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा शहर पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी पुण्यातील भाजपाच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही प्रभागांमधील जागांबाबत निर्माण झालेला तिढा अखेर मुख्यमंत्र्यांकडून सोडविला जाणार असून बुधवारी भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले व इतर प्रमुख पदाधिकारी सोमवारी रात्री मुंबईत पोहोचले. त्यानंतर पुण्यातील जागांचा तिढा सोडविण्यासाठी त्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक राहिले असताना अजून पहिली उमेदवारी यादीही जाहीर न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटत असलेल्या इच्छुकांकडून शिवसेना व मनसेच्या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी एक हजार इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यानंतर १६२ जागांवरील उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी २५ जानेवारीपासून भाजपा कार्ड कमिटी सदस्यांच्या बैठका सुरू आहेत. अनेक प्रभागांमधील जागांबाबत कार्ड कमिटीच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आमदारांच्या बैठका घेऊन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.कार्ड कमिटीकडून ९० सदस्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र त्यातील अनेक नावांवर एकमत झाले नव्हते, त्याचबरोबर काही विद्यमान नगरसेवकांचे नाव यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर तुमचे उमेदवारांच्या नावांवर एकमत करा; अन्यथा आम्ही निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पुन्हा कार्ड कमिटीच्या बैठका घेऊन उमेदवारांच्या नावांचा फेरविचार करण्यात आला. त्यानंतर सुधारित यादी घेऊन पालकमंत्री गिरीश बापट व शहराध्यक्ष योगेश गोगावले सोमवारी रात्री मुंबईत पोहोचले आहेत.मनसेचीही यादी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.