शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाचे राजकारण

By admin | Updated: April 25, 2016 01:39 IST

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांवरून पिंपरी-चिंचवडमध्ये तू-तू मैं-मैं सुरू आहे.

केंद्र व राज्य सरकारमध्ये युती करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांवरून पिंपरी-चिंचवडमध्ये तू-तू मैं-मैं सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादावरून वैयक्तिक द्वेषाचे, विखारी प्रचाराचे राजकारण दोन्ही समविचारी पक्षांना धोकादायक ठरू शकते. अनधिकृत बांधकामांनंतर एचएच्या प्रश्नावरून दोघांत जुंपली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला लक्ष्य करायचे सोडून या दोन पक्षांतील कार्यकर्ते आपापसांतच लढत बसले आहेत. त्यांना शहाणपण येणार कधी, असा खरा प्रश्न आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेस विचाराचे या महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा बालेकिल्ला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला. आघाडीचे सरकार जाऊन युतीचे सरकार आले. केंद्र, राज्यातील युतीत जशी धुसफूस सुरू आहे. तशीच धुसफूस पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे. श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. वैयक्तिक पातळीवर टीकादोन खासदार, तीन आमदार, एक राज्यसभा सदस्य, एक राज्यमंत्री पद या पिंपरी-चिंचवड शहराला मिळाले आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुसफूस सुरू आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर प्रत्यक्षपणे टीका करीत नसले, तरी कार्यकर्त्यांत धुसफूस सुरू ठेवली आहे. अनधिकृत बांधकाम प्रश्नानंतर एचए कंपनीतील खासदार बारणेंच्या सभेवरून भाजपाचे नेते नामदेव ढाके यांनी वैयक्तिकटीका केली. प्रश्न सोडविता येत नसेल, तर राजीनामा द्यावा, असे आव्हान दिले. ढाकेंच्या या टीकेने एचए कामगार, तसेच ढाकेंचे पूर्वाश्रमीचे टाटा कंपनीतील सहकारी यांचे पित्त खवळले आहे. ‘एचए कामगार आंदोलन सुरू असताना भाजपाचे नेते कुठे गेले होते. कामगारांच्या भावनेशी खेळाल तर याद राखा, असा इशारा दिल्याने हा वाद आणखीणच पेटणार असल्याची चिन्हे दिसतात. अनधिकृत बांधकामे प्रश्नावरून शहरात श्रेयवादाचे राजकारण पेटले होते. आता एच. ए. वरून सेना भाजपात जुंपली आहे. विकासासाठी पक्षांत जुपणे ही चांगली गोष्ट आहे. त्यातून प्रश्न सुटले तर ठीक. एचए प्रश्नाबाबत कामगारांच्या भावनांशी खेळणे, दु:खावर मीठ चोळणे योग्य नाही. ज्या व्यक्तीने प्रयत्न केले. त्याचे त्याला श्रेय मिळायलाच हवे. एचए प्रश्नी किंवा अनधिकृत बांधकाम प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीनेही प्रयत्न केले होते. आता सत्तेवर असणाऱ्या भाजपा-सेनेचेही प्रयत्न सुरू आहे. कोणामुळे काय झाले हे या नगरीतील जनता चांगल्या प्रकारे जाणते. त्यामुळे श्रेयवादाचे, वैयक्तिक द्वेषाचे राजकारण दोन्हीही पक्षांना हितावह नाही.बोपखेलवासीयांची टिंगलखडकीतील कार्यक्रमात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. त्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोपखेलचा प्रश्न छेडला असता, याबाबत पालकमंत्र्यांना विचारा, असे उत्तर देऊन आपली जबाबदारी टाळली. याचाच अर्थ या प्रश्नी कोणताही धोरणात्मक निर्णय हे सरकार घेऊ शकत नाही, हे दिसून येते. त्यामुळे बोपखेलवासीयांचा प्रश्न तसाच पडून राहणार आहे.पालिकेत युतीचे काय?सध्याची शिवसेना आणि भाजपा नेत्यांतील अंतर्गत धुसफूस पाहता येत्या महापालिका निवडणुकीत युती होणार नाही, हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देणे अशक्य वाटते. युती न होणे हे राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेवर भगवा फडकाविणे अवघड आहे.