शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘शास्ती’वरून भाजपा-शिवसेनेत जुंपली

By admin | Updated: February 11, 2017 02:26 IST

महापालिकेची आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर राज्य सरकारने शास्तीकरात सवलतीचा शासनादेश काढला. मात्र, वेबसाईटवर आदेश दिसत

पिंपरी : महापालिकेची आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर राज्य सरकारने शास्तीकरात सवलतीचा शासनादेश काढला. मात्र, वेबसाईटवर आदेश दिसत नसल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. शासनादेश काढल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर खोटे सांगून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात अनिधकृत बांधकामाचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात भाजपा सत्तेत आल्यानंतर अनधिकृत बांधकामे १०० दिवसांत नियमित करू, असे आश्वासन मुख्यमंत्री व स्थानिक नेत्यांनी दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. शहरात सुमारे चार लाख बांधकामांपैकी पन्नास टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. महापालिकेने प्रशासनाने या बांधकामांना लावलेल्या दुप्पट शास्तीने नागरिक धास्तावले आहेत.ही शास्ती महापालिका निवडणुकीपूर्वी रद्द करू, असे आश्वासन भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले होते. मात्र, आचारसंहिता जारी झाली, तरी आदेश आला नाही, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. एवढेच नव्हे तर सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांकडूनही केली जात आहे. तर भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत हा जीआर दाखविला. श्रेयवादाचे राजकारणएकीकडे राज्य शासनात एकत्र असताना पिंपरी-चिंचवडमध्ये या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शास्तीचा जीआर खरा की खोटा यावरून जुंपली आहे. श्रेयवादाचे नवे राजकारण अनुभवयास मिळत आहे. नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. (प्रतिनिधी)