शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेना युती संपुष्टात?

By admin | Updated: December 30, 2016 04:42 IST

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचविले.

पिंपरी : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचविले. तरीही भाजपाने स्वतंत्रपणे फ्लेक्सबाजी सुरू केली आहे. फ्लेक्सच्या माध्यमातून भाजपाने एकला चलोची भूमिका घेतल्याने भाजपा आणि शिवसेना युती संपुष्टात आली आहे, अशी चर्चा सुरू आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. महापालिकेतून राष्ट्रवादीची सत्ता उलथून लावण्याचा नारा भाजपाने दिला आहे. शहर पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिकेत सत्ता येण्यासाठी युती आवश्यक आहे, अशी सूचना केल्याने खासदार अमर साबळे आणि शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेसमोर सर्वप्रथम युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहराध्यक्ष राहुल कलाटे, आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी चर्चाही झाली होती. मात्र, दोन्ही पक्षांनी युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे सूचित केले होते. त्याचवेळी परस्पर विश्वास असावा, कोणत्याही अर्टी-शर्तीने युती होणार नाही, असे सूचित केले होते. निर्णय होईपर्यंत स्वबळाची तयारी करा, असेही दोन्ही पक्षांनी सूचित केले होते. (प्रतिनिधी)जुन्या-नव्यांचा वादाचा अडथळा...महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपाची युती व्हावी, अशी भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांतून आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांमुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांतील श्रेयवादाच्या राजकारणामुळे युतीत अडचण येत असल्याची चर्चा शहरात आहे. कार्यकर्ते अस्वस्थमहापालिकेची आचारसंहिता जारी होण्यास आता काही दिवसांचा कालावधी उरला असताना युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजपाकडे सुमारे पाचशे अर्ज आलेले आहेत, तर शिवसेनेनही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. युतीचा अधिकृत निर्णय झाला नसताना दुसरीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाजपाचे स्वतंत्रपणे फ्लेक्स झळकू लागले आहेत. त्यामुळे युतीची शक्यता मावळली असल्याचे दिसून येत आहे.