शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच आमचा प्रमुख विरोधक : विजय शिवतारे

By admin | Updated: February 3, 2017 04:04 IST

प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचेष असे भाजपांचे धोरण आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप्ाांच आमचा

बारामती : प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचेष असे भाजपांचे धोरण आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप्ाांच आमचा क्रमांक एकचा विरोधक आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेना सर्व ताकतीने लढणार आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.बारामतीत शिवसेना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी शिवतारे आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भाजपात गुंडांना प्रवेश दिला जात आहे. स्थानिक पक्ष म्हणून आम्ही कोणाशीही युती न करता लढत आहे. प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचे धोरण भाजपाचे आहे. त्यामुळे भाजपाच आमचा या निवडणुकांमध्ये मुख्य विरोधक असेल.’’बारामतीच्या नेत्यांकडे अनेक वर्षांपासून सत्ता होती; परंतु ४० ते ४२ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सोडवता आला नाही.नीरा खोऱ्याचे पाणी वाया जात असताना जलसंपदा खाते, उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतानादेखील अजित पवारांनी काही केले नाही, अशी टीका त्यांनी केली. बेबी कालव्याचे ४० कोटी रुपये हडप केल्याने अतिरिक्त पाणी मागील १५ वर्षे सत्ता असताना मिळविता आली नाही. मात्र, दीड वर्षात दोन्ही उपसा योजनांतून जादा आवर्तने देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचे श्रेय घेऊच नये. भाजपाचा तर दुरान्वये याच्याशी संबंध नाही, असा टोलात्यांनी मारला. शिवतारे यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करीत असताना भाजपला अधिक लक्ष्य केले. बारामतीतील स्थानिक पवारविरोधक सत्तेची ऊब मिळू लागल्यावर भाजपामध्ये गेले आहेत.काँग्रेस, राष्ट्रवादी संपत चाललेले पक्ष आहेत. त्यामुळे भाजपाला अधिक आमचा विरोध असेल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला घाई कशाची..?जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सतत सांगतात. इसाप नीतीच्या कथेप्रमाणे राष्ट्रवादीचे चालले आहे.कावळ्याच्या तोंडातील घास मिळविण्यासाठी कोल्हा ज्या पद्धतीने शक्कल लढवतो तसे राष्ट्रवादीचे आहे. विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्याबरोबर भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणाच घातक ठरली, असे खळबळजनक विधान शिवतारे यांनी केले. परंतु, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आपण फारसे बोलणे उचित नाही, असा टोलादेखील त्यांनी मारला.