शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला बहुमत

By admin | Updated: January 13, 2015 05:41 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीत भाजपने सातपैकी चार जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. काँगे्रसचे दोन उमेदवार निवडून आले

पिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीत भाजपने सातपैकी चार जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. काँगे्रसचे दोन उमेदवार निवडून आले; तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. ‘मोदी’ लाटेचा प्रभाव कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीतही दिसून आला. ‘कमळ’ फुलल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष लागलेल्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार रघुवीर शेलार व भाजपचे अधिकृत उमेदवार रवींद्र शेलार यांच्यात लढत झाली. रघुवीर शेलार यांनी १ हजार २७० मते मिळवीत रवींद्र शेलार यांचा ५९२ मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये भाजपच्या सारिका नाईकनवरे व राष्ट्रवादीच्या अर्चना दाभोळे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. नाईकनवरे यांना १ हजार ५६८ मते मिळाली, तर दाभोळे यांनी १ हजार ४९८ मते घेतली. त्यांचा अवघ्या ७० मतांनी पराभव झाला. शिवसेनेच्या अर्चना भोसले ५१९ मते मिळवीत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. काँगे्रसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये काँगे्रसचे हाजी मलंग मारिमुत्तू १ हजार ४९२ मतांनी विजयी झाले, तर अपक्ष उमेदवार नौसिया अमिन शेख यांना १ हजार २६० ही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. याठिकाणी भाजपचे उमेदवार अजय लांगे यांना ८३० मतांवरच समाधान मानावे लागले. वॉर्ड क्रमांक चारमध्ये काँगे्रसचे उमेदवार गोपाळ तंतरपाळे १ हजार ५६९ इतक्या मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांना २ हजार ३७३ मते मिळाली. कृष्णा आरगुनम यांना ८०४ मते मिळाली. पाच क्रमांक वॉर्डात भाजपच्या विशाल खंडेलवाल यांनी १ हजार ०३ मते मिळवीत विजय संपादन केला. या वॉर्डात राष्ट्रवादी, शिवसेनेसह अपक्ष उमेदवारांनी चांगली मते घेतली. सहा क्रमांकाच्या वॉर्डमध्ये भाजपचे ललित बालघरे व अपक्ष बाळासाहेब जाधव यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये बालघरे १ हजार ८४७ मते मिळवीत विजयी झाले. वॉर्ड क्रमांक सहामध्ये एकतर्फी लढत पाहायला मिळाली. भाजपच्या अरुणा पिंजण यांनी तब्बल २ हजार ५३९ मतांनी विजय मिळविला. तर पराभूत उमेदवाराला अवघी ३१८ मते पडली. रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी कॅन्टोन्मेट बोर्डाच्या कार्यालयाशेजारी करण्यात आली. ८ वाजून १० मिनिटांनी मतदान यंत्रे ‘स्ट्राँग रूम’मधून मतमोजणी कक्षात नेण्यात आली. साडेआठला प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. ४ आणि ७ वॉर्डांसाठी मतमोजणीच्या सात फेऱ्या झाल्या. इतर वॉर्डांसाठी सहा फेऱ्या झाल्या. प्रत्येक टेबलवर १ अधिकारी, दोन कर्मचारी नेमले होते. तसेच सातही टेबलवरील मतमोजणीचे चित्रीकरण व छायाचित्र टिपले जात होते. (प्रतिनिधी)