शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

राज्यात सातपैकी सहा कॅन्टोन्मेंटवर भाजप-सेना

By admin | Updated: January 15, 2015 00:06 IST

देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत भाजपाने प्रतिष्ठेच्या जागा गमावल्या असल्या, तरी बहुतांश बोर्डांमध्ये ठिकाणी भाजपची सत्ता आली,

सर्वजित बागनाईक, खडकीदेशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत भाजपाने प्रतिष्ठेच्या जागा गमावल्या असल्या, तरी बहुतांश बोर्डांमध्ये ठिकाणी भाजपची सत्ता आली, तर राज्यातील ७ पैकी ६ ठिकाणी भाजप-सेना सत्तेत आली. खडकीत मोदी लाटेचा प्रभाव झाला नाही, काँगे्रसने गड राखला.लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपाठोपाठ बोर्डाची निवडणूक झाली. महाराष्ट्रातील भिंगार (अहमदनगर), औरंगाबाद, देवळाली (नाशिक), कामठी (नागपूर), देहूरोड, पुणे व खडकी या ठिकाणी भाजप-सेनेने वर्चस्व राखले. तर खडकीत मात्र, काँग्रेसने बाजी मारली. कामठी, देहूरोड, पुणे, देवळाली या ठिकाणी भाजपला बहुमत मिळाले. निवडणूकीमध्ये बहुतांश ठिकाणी भाजप-सेनेची युती नव्हती. दोघांनीही स्वतंत्र जागा लढविल्या. औरंगाबादमध्ये भाजप-सेना युती झाल्यास ७ पैकी ४ व नगरमध्येसुद्धा ७ पैकी ४ जागांमुळे बहुमत मिळू शकते. राज्यातील केवळ खडकीत काँगे्रसची सत्ता कायम राहिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी फारशे यश मिळाले नाही. तर मनसे निवडणूक रिंगणातच उतरली नव्हती. शिवसेनेलाही हवा तेवढा फायदा घेता आला नाही. पुणे परिसरातील तीनपैकी एकही जागा सेनेला मिळाली नाही. तर पुण्यातील ८ पैकी ५ जागांवर व खडकीतील १ जागेवर भाजपाने विजय मिळविला. तर अहमदनगरच्या भिंगार बोर्डात भाजपला १, सेनेला ३, राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या. तसेच औरंगाबाद बोर्डात ७ पैकी २ सेना, २ भाजप व ३ अपक्ष निवडूण आले. दोन्ही ठिकाणी काँगे्रसला एकही जागा मिळविता आली नाही. नाशिक येथील देवळाली कॅन्टोन्मेंटमध्ये ८ पैकी ६ जागा घेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. तर सेना व अपक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली. नागपूर येथील कामठी बोर्डात भाजपने ४, अपक्ष २, काँगे्रसने १ जागा मिळवली. येथेही भाजप समर्थक उमेदवार स्वबळावर सत्ता स्थापन करतील. देहूरोड ७ पैकी ४, पुणे ८ पैकी ५ जागा मिळवित भाजपने स्वबळावर झेंडा रोवला.