वडगाव मावळ : सांगवी येथे तांबड्या रंगाच्या पिसाळलेल्या कुत्रीने शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत तीन बालकासह आठ ग्रामस्थांना चावा घेतला. ग्रामस्थ हातात काठ्या घेऊन पिसाळलेल्या कुत्रीचा पाठलाग करताच पीकात लपुन बेसावध ग्रामस्थांना चावा घेत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. जांभुळ अंतर्गत असलेल्या सांगवी गावात तांबड्या रंगाची कुत्री पिसाळली आहे. अंगणात खेळत असलेल्या काव्या ओव्हाळ (वय २ ) बालिकेच्या आणि ओमकार तोडकर ( वय ५) या बालकाच्या तोंडाला चावा घेतला. त्यांना गंभीर जखम झाली आहे. प्रवेश पवार (वय १५) याच्या हाताला व सुभद्रा तोडकर (वय ५५) यांच्या डोळ्यालगत चावा घेतला. अन्य चार ग्रामस्थांना चावा घेतला आहे.पशुधन विकास अधिकारी डॉ.अनिल परंडवाल म्हणाले, पिसाळलेल्या कुत्र्यांचा पकडण्याची व्यवस्था नगरपरिषद व महानगरपालिकेत आहे. ग्रामीणभागात ही व्यवस्था नाही. येथे अशी व्यवस्था उपलब्ध करण्याची आवश्यक आहे.(वार्ताहर)
पिसाळलेल्या कुत्रीचा आठ ग्रामस्थांना चावा
By admin | Updated: January 12, 2015 02:20 IST