पुणे : भीमा उपखोऱ्यातील २५ धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला असून गेल्या पुर्वी झालेल्या, डोंगर दऱ्यांतून वाहणाऱ्या पावसाचे पाणी साचून आठवडाभरात फक्त १.१७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साठा वाढू शकला आहे. भिमा उपखोऱ्यात २७ जून अखेर ४०.६९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. आज अखेर ४१.८६ टीएमसी साठा आहे. आज सकाळी ८ पर्यंत संपलेल्या २४ तासांत ०. १९ टीएमसी पाणी साठा जमा झाल्याचे सिंचन भवनमधून सांगण्यात आले. गुंजवणी धरणात बारा टक्के साठा होता, तो आज शंभर टक्के झाला आहे. उजनीमध्ये उणे ७.१८ अब्ज घनफूट (टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा आहे.पावसाने दडी मारल्याने आठवडाभरात पूर्वी झालेल्या, डोंगर द-यांतून वाहणा-या पावसाचे पाणी साचून आठवडाभरात केवळ १.१७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाढले. खडकवासला प्रणालीत ७.३१ टीएमसी पाणी साठा असून त्याची टक्केवारी २५.८ आहे. (प्रतिनिधी)
भीमा खोऱ्यात १.१७ टीएमसीने पातळीत वाढ
By admin | Updated: July 7, 2015 04:09 IST