शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंगवर कोट्यवधींची उधळपट्टी, तरीही स्थायी समितीची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:50 IST

पुणे : महापालिका शाळांसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या २१ कोटी रूपयांच्या ई-लर्निंग प्रकल्पातील डिजिटल अभ्यासक्रमास राज्य मंडळाचा (एसएससी बोर्ड) अभ्यासक्रम तयार करणाºया बालभारतीची मान्यताच मिळाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे : महापालिका शाळांसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या २१ कोटी रूपयांच्या ई-लर्निंग प्रकल्पातील डिजिटल अभ्यासक्रमास राज्य मंडळाचा (एसएससी बोर्ड) अभ्यासक्रम तयार करणा-या बालभारतीची मान्यताच मिळाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. डिजिटल अभ्यासक्रमाला अधिकृत मान्यता नसताना तो विद्यार्थ्यांवर थोपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधेचा अभाव असताना प्रशासनाकडून २१ कोटी रुपये खर्च करून ई-लर्निंग प्रकल्प राबविण्याचा घाट घालण्यात आला आहे. याअंतर्गत २८७ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लास रूम उभारली जाणार आहे. मात्र या क्लासरूममध्ये शिकविण्यासाठीच्या डिजिटल अभ्यासक्रमास अद्याप बालभारतीची मंजुरीच मिळालेली नाही. संबंधित कंपनीने या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळण्यासाठी १ वर्षापूर्वी बालभारतीकडे अर्ज केला असून त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी शाळांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. या समितीने अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार शाळांमध्ये फळे, बसण्यासाठी बेंच, टेबल, खुर्च्या, शौचालये, शिक्षक यांची गरज आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुधारणा करायच्या झाल्यास यासाठी ३६ कोटी रुपयांची गरज असल्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला आहे. तरीही मात्र तरीही ई-लर्निंगवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचा अट्टहासावर टीका करण्यात येत आहे.महापालिकेच्या संगणक लॅब सुसज्ज करण्यासाठी ८४९ एलईडी टीव्ही, शेकडो संगणक खरेदी करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थांनी अनेक संगणक व इतर सामग्री पालिकेच्या शाळांना भेट दिलेली आहे. तरीही पुन्हा त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला आहे, यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे.प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्ताव हा चार वर्षांसाठी असून त्यासाठी २० कोटी ९९ लाख रुपये खर्च होणार आहे. याअंतर्गत महापालिकेच्या २८७ शाळांमध्ये ८६१ व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम २ डी व ३ डी अ‍ॅनिमेशन तयार करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग समजणे सोपे जाईल. यासाठी बीएसएनएलकडून इंटरनेट सुविधा पुरविली जाईल. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.अचानक ३ कोटी कसे कमी झालेकाही महिन्यांपूर्वी २४ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीला सादर केली होती. याला विरोध झाल्यामुळे आता २१ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीला मान्यतेसाठी सादर करण्यात आली आहे. या प्रस्तावावर टीका झाल्यानंतर अचानक ३ कोटी रुपये कमी कसे झाले. मूळ प्रस्ताव मांडताना ते वाढीव का ठेवण्यात आले होते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.डिजिटल अभ्यासक्रम स्वस्तात उपलब्धई-लर्निंग प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांबरोबरच डिजिटल अभ्यासक्रमासाठीदेखील पालिकेकडून मोठ्या प्रमाणातखर्च केला जात आहे.वस्तुत: बाजारात सर्वच इयत्तांचे वेगवेगळ््या कंपन्यांचे अनेक डिजिटल अभ्यासक्रम स्वस्तात उपलब्ध असताना यासाठी लाखो रुपयांची तरतूद का हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.चौकशी करून कार्यवाहीमहापालिकेच्या प्रस्तावित ई-लर्निंग अभ्यासक्रमासाठी बालभारतीची मान्यता घेण्यात आली आहे का, याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करू, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.