शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पांचे सर्वांत मोठे चित्र

By admin | Updated: September 22, 2015 03:20 IST

कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी आजपर्यंतचे गणेशाचे सर्वांत मोठे मोझॅक चित्र साकारून गणरायाला वंदन केले.

पुणे : कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी आजपर्यंतचे गणेशाचे सर्वांत मोठे मोझॅक चित्र साकारून गणरायाला वंदन केले. तब्बल ५२०० विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पांची प्रतिमा साकारली आणि म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात बाप्पांचा जल्लोष झाला. श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलातील विस्तीर्ण मैदानावर रंगलेल्या या अभूतपूर्व सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आहे. त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये आपल्या कृतीतून नवनिर्मिती करीत संस्कृती जोपासणारे उपक्रम राबविण्याच्या हेतूने ‘लोकमत’च्या माध्यमातून मागील वर्षापासून ‘आपले बाप्पा’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत चित्ररूपी गणराय साकारून पुणेकरांना विश्वविक्रमाची अनोखी भेट दिली. यंदाही सिद्धिविनायक ग्रुप प्रस्तुत आणि संजय घोडावत ग्रुप सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलातील मुख्य स्टेडियममध्ये सकाळपासूनच गणरायाला वंदन करण्यासाठी उत्साह ओसंडून वाहत होता. पुणे व पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील विविध शाळांमधील तब्बल पाच हजार दोनशे विद्यार्थी या वेळी एकत्रित आले होते. आकाशात ढगांची दाटी अन् मैदानावरील हिरवळीवर बालचमुंच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने आल्हाददायक बनलेल्या वातावरणात प्रत्येक जण गणरायाला अनोखे वंदन करण्यासाठी आसुसलेला होता. गणेशाची भव्य प्रतिमा साकारण्यासाठी ५०-५० विद्यार्थ्यांचे १०४ गट करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिस्तबद्धपणे स्टेडियमच्या मैदानावर बसविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडे गणरायाच्या प्रतिमेसाठी तयार करण्यात आलेले एक-एक शीट देण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला अशा आगळ्या-वेगळ्या प्रकारे वंदन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांत विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेले शीट उंचावून बाप्पांची भव्य प्रतिमा साकारली. त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष साजरा करण्यात आला. उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या उपक्रमाला दाद दिली. या वेळी सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार साकला, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, न्यू पुना बेकरीचे कुणाल भूषण गिरमकर आदी उपस्थित होते. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., हॉटेल कोर्टयार्ड मॅरिएट, न्यू पूना बेकरी आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.