पुणो : पीएमपीएमएलच्या वाहक पदासाठीची लेखी परीक्षा रविवारी सकाळी राज्यभरातील 79 केंद्रांवर पार पडली. ही परीक्षा सुरळीत झाली.
वाहकांसाठीच्या 1क्53 पदांसाठी 23 हजार 88क् उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यामुळे भरतीला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यामध्ये 9 केंद्रांवर परीक्षा झाली, असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
जानेवारी 2क्14 मध्ये पीएमपीमध्ये वाहक भरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्याला प्रतिसाद देत फेब्रुवारी महिन्यार्पयत 41 हजार 7क्8 उमेदवारांनी अर्ज केले. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
राज्यातील 1क् ठिकाणी एकाच वेळी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, लातूर, परभणी, अहमदनगर आणि पुणो या ठिकाणी एमकेसीएल तर्फे परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रांवर भरारी पथके नेमण्यात
आली होती. (प्रतिनिधी)
संकेतस्थळावर लवकरच ‘अॅन्सर की’
4परीक्षेकरिता 2क्क् गुणांचे 1क्क् प्रश्न देण्यात आले होते. आता संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘अॅन्सर की’ प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांकडून आलेले आक्षेप नोंदवून 8 दिवसांच्या आत शंकानिरसन केले जाणार आहे. त्यानंतर ‘अंतिम अॅन्सर की’ आणि निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. कागदपत्रंच्या पडताळणीनंतर पीएमपी प्रशासन निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविणार आहे. या प्रक्रियेकरिता किमान एक महिन्याचा कालावधी अपेक्षित असल्याचे एमकेसीएल पुणो विभागाचे हिरामण मगर यांनी सांगितले.