शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

बालेकिल्ल्यातील जागांसाठी मोठी गर्दी

By admin | Updated: January 10, 2017 03:34 IST

भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूड, कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ ते २० साठी मुलाखती घेण्यात आल्या

पुणे : भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूड, कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ ते २० साठी मुलाखती घेण्यात आल्या, या १० प्रभागांसाठी २६८ इच्छूकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने रात्री उशीरपर्यंत मुलाखती सुरू होत्या.भाजपाच्या रामबाग, मयुर, डहाणुकर, हॅपी कॉलनी, एरंडवणा, शनिवार, कसबा, सदाशिव पेठ या बालेकिल्ल्यातील प्रभागांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या. कसबा मतदारसंघातील प्रभागांचे इच्छुक मुलाखतीसाठी आल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनीच बहुतांश उमेदवारांची माहिती पॅनेलला दिली. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने वेगाने मुलाखती घेण्यात आल्या. राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस मुरली मोहोळ, उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ, गणेश घोष, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, अनुसुचित जाती मोर्चचे समन्वयक  डॉ. भरत वैरागे यांच्या पॅनेलने मुलाखती घेतल्या. मंगळवारी प्रभाग क्रमांक २१ ते ३० आणि बुधवारी ३१ ते ४१ प्रभागांच्या मुलाखती होणार आहेत. (प्रतिनिधी)