शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

इस्टेट एजंटवर बिबवेवाडीत गोळीबार

By admin | Updated: August 26, 2014 04:48 IST

मोटारसायकलवरून जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकावर दोन हल्लेखोरांनी भर रस्त्यातच गोळ्या झाडल्या.

पुणे : मोटारसायकलवरून जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकावर दोन हल्लेखोरांनी भर रस्त्यातच गोळ्या झाडल्या. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लेक टाऊन सोसायटीजवळच हा थरार घडला. या गोळीबारात हा बांधकाम व्यावसायिक किरकोळ जखमी झाला असून,हा हल्ला जमीन खरेदी विक्रीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.फिरोज चांद मुजावर (वय ३८, रा. सर्वे क्र. १३/३१, चिंतामणी हाईट्स, धनकवडी) असे जखमीचे नाव आहे. मुजावर याच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. मुजावर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच, श्वान खरेदी-विक्रीचाही व्यवसाय आहे. मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल आहे. तो खासगी बाउंसर म्हणून काम करत होता. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुजावर हे बिबवेवाडीतील मानसी लेक टाऊनच्या चढावरून त्यांच्या मोटारसायकलवरून जात होते. त्या वेळी पाठीमागून मोटारसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या आरोपीने पिस्तुलातून मुजावर याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. दुचाकीहून खाली पडलेल्या मुजावर याच्या गुडघ्याजवळ गोळ्या लागल्या आहेत. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुजावरची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सहायक आयुक्त जयवंत देशमुख यांनी सांगितले. पोलिसांकडून या गोळीबाराबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात येत नव्हती. तसेच सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन घेण्याचे सोईस्कररीत्या टाळले.(प्रतिनिधी)