भुलेश्वर : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिराजवळील वन विभागात पावसाळ्यात दोन हजार झाडे लावण्यात आली होती. या झाडांना पाणी देण्याची तरतूद असल्याने उन्हाळ्यातही ही झाडे हिरवीगार राहणार आहेत. या झाडांची चांगली वाढ झाली असून, परिसर हिरवागार दिसत आहे.माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून भुलेश्वर वन विभागासाठी निधी देण्यात आला होता. या निधीतून वन विभागाच्या परिसरात दोन हजार झाडे लावण्यात आली. पाण्याचे योग्य नियोजन केल्याने उन्हाळ्यातही ही झाडे हिरवीगार राहणार आहेत. विशेष म्हणजे, या झाडांवर औषधफवारणीही करण्यात येत आहे.
भुलेश्वर गड झाला हिरवागार
By admin | Updated: December 20, 2014 00:08 IST