शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमुळे भोसरीकर घामाघूम

By admin | Updated: May 27, 2017 01:06 IST

गेल्या आठवडाभरात भोसरी एमआयडीसी आणि भोसरी गावठाण परिसरातील नागरिक व उद्योजक महावितरणच्या अनियमित विद्युतपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : गेल्या आठवडाभरात भोसरी एमआयडीसी आणि भोसरी गावठाण परिसरातील नागरिक व उद्योजक महावितरणच्या अनियमित विद्युतपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून, ऐन उन्हाळ्यात दिवसातून २ ते ३ तास वीज गायब असल्याने उन्हाच्या कडाक्याने भोसरीकर घामाघूम झाले आहेत. एकीकडे अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आधीच घशाला कोरड पडलेल्या शहरवासीयांना आता विजेच्या लपंडावालाही तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. भोसरी औद्योगिक परिसरात हजारो छोटे मोठे उद्योजक व्यवसाय करतात. दर गुरुवारी सार्वजनिक सुटी असल्याने या काळात महावितरणची दुरुस्तीची कामे केली जातात तरीही इतर दिवशी सर्रासपणे वीज खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे लघुउद्योजकांत तीव्र नाराजी आहे. भोसरी गावठाण भागातही छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय करतात. विजेशिवाय व्यवसाय करणे खर्चिक ठरत असून, मे महिन्याच्या उन्हाळ्यात वीज खंडित झाल्याने नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत.उद्योजकांना आर्थिक भुर्दंड उद्योगांना अनियमित वीजपुरवठा होत असल्याने उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, महावितरणचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. परिणामी विजेच्या लपंडावामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याने उद्योजक नाराज आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजप्रवाहामुळे उद्योजकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दुरुस्तीची कामे ‘जैसे थे’ भोसरी परिसरातील ओव्हरहेड तारा जुन्या झाल्याने वारंवार तुटत असल्याने मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होते. कमी उंचीच्या वायरमुळे अधिक उंचीच्या मालवाहतूक वाहनांना शॉक लागून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सर्व ओव्हरहेड वायर काढून भूमिगत कराव्यात, अशी मागणी कित्येक महिन्यांपासून उद्योजक करीत आहेत. कुदळवाडी, चिखली, मोरे वस्ती, भोसरीतील सेक्टर ७, १०, जे ब्लॉक, गट क्रमांक ७१० येथे वारंवार वीज जाते. वीजमीटरसंबंधीसुद्धा उद्योजकांच्या तक्रारी असून, त्याकडेही महावितरणचे अधिकारी लक्ष देत नाहीत.