समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुर्यकांत कऱ्हाळे उपस्थित होते. भोर तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथील प्रसार रोखण्याच्या उद्देशाने भोर नगरपालिका क्षेत्रामध्ये ७ मे शुक्रवार पहाटे १ वाजल्यापासून १२ मे बुधवार रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सदर काळात फक्त रुग्णालय सुविधा,औषधे दुकाने सुरू असतील. तर सकाळी ७ ते ९ या कालावधीत दूध वितरण सेवा चालू राहील. भाजीपाला, फळे, किराणासह सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान, पाच दिवसांचे लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सदर कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा निर्देश दिले आहेत आणि लोकांनीही घराबाहेर न पडता घरातच राहावे आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमाचे पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.
भोर शहर ७ ते १२ मे लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST