शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

भोरला काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: September 13, 2015 01:35 IST

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुणे : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत राजगड सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बिनविरोध झालेल्या ४ जागाही काँग्रेस पक्षाच्या असल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्याने, पुन्हा एकदा बाजार समितीत काँग्रेसने एकहाती सत्ता कायम राखली आहे. विरोधी राष्ट्रवादीच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवारांची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांचा माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०१५ ते २०२०च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध गटांतील १९ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या सर्व जागा काँग्रेसच्याच होत्या, तर १५ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यांत काँॅग्रेस व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी १५ तर शिवसेनेचे २, भाजपाचा एक आणि दोन जागांवर अपक्ष उभे होते. आज सकाळी ९ वाजल्यापासून खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये निवडणूक अधिकारी प्रवीण परब यांनी ग्रामपंचायत व कृषी पतसंस्था मतदारसंघातील मतमोजणी एकाच वेळी सुरू केली. प्रथम खानापूर, संगमनेर, भोर, आंबेघर या मतदान केंद्रांपैकी भोर वगळता इतर तिन्ही केंद्रांवर सुरवातीपासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि नंतर शिवरे, किकवी, नसरापूर या केंद्रांवरही आघाडी कायम ठेवून सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळविला.कृषी पतसंस्था मतदारसंघात कमीत कमी ७३, तर जास्तीत जास्त १२९ मतांनी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक ४७२ मते संदीप चक्के यांनी घेतली, तर ग्रामपंचायत मतदारसंघात सोमनाथ निगडे यांना सर्वाधिक ५५१ मते मिळाली आहेत. सर्व ७ मतदान केंद्रांवर एकूण मतांपैकी कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघात १०१, महिला गटात ५५, इतर मागास गटात ४६, भटक्या विमुक्त गटात ४८ मते बाद झाली, तर सर्वसाधारण मतदारसंघात ५७, अनुसूचित जाती गटात ५०, आर्थिक दुर्बल गटात ४९ मते बाद झाली आहेत. एकूण मतांपैकी १० ते १५ टक्के मते बाद झाली, तर तेवढ्याच मतांचे क्रॉस वोटिंग झाले आहे.मागच्या वेळी वाटाघाटी करून, ५ जागा राष्ट्रवादीला दिल्या होत्या. सध्या दुष्काळसदृश परिस्थती असल्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच आमची इच्छा होती. तरीही विरोधकांनी निवडणूक लादली. सर्वच जागा जिंकून आम्ही विरोधकांना खऱ्या अर्थाने धोबीपछाड दिला आहे. - संग्राम थोपटे (आमदार, राजगड कृषी विकास पॅनलचे प्रमुख)