शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भीमाशंकरचा होईना विकास!

By admin | Updated: November 10, 2014 22:48 IST

o्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखडा आखण्यात आला. मात्र, वन्यजीव विभागाच्या जाचक अटींमुळे येथे विकासकामे करता येत नाहीत.

नीलेश काण्णव - भीमाशंकर
o्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखडा आखण्यात आला. मात्र, वन्यजीव विभागाच्या जाचक अटींमुळे येथे विकासकामे करता येत नाहीत. देशभरातून भाविक ज्योतिर्लिगाच्या दर्शनासाठी येत असतात; मात्र येथे मूलभूत सोईसुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. o्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसर वन्यजीव विभागाच्या हद्दीत येतो. मंदिराच्या परिसरात देवस्थानकडे जागा नाही. आहे त्या जागेत सर्व सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत. वन्यजीव विभाग त्यांच्या जागेत काही काम करू देत नाही.
 
6 फूट जागेसाठी दोन वर्षे जाऊनही प्रश्न ‘जैसे थे’
 
सध्या मंदिराकडे येण्यासाठी पाय:यांनी पायी यावे लागते. मंदिराच्या मागून पर्यायी कच्च रस्ता आहे. हा रस्ता पक्का सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी मागील वर्षी 85 लक्ष रूपये मंजूर झाले होते. मात्र, या कामाला वन्यजीव विभागाची परवानगी नसल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. हा रस्ता सध्या 1क् ते 12 फूट रूंद आहे, तर तो नव्याने करताना 16 ते 18 फूट रुंद करावयाचा आहे. 6 फूट जागा मिळवण्यासाठी परवानगीची फाईल पुणो, नागपूर, भोपाळ व शेवटी दिल्लीर्पयत जाते. या प्रक्रियेला दोन वर्षे वेळ जातो.  हे काम झाले असते तर आबालवृद्ध व अपंग भाविक गाडीने मंदिरार्पयत पोहोचले असते, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. 
 
राहण्याची सुविधा नाही
भीमाशंकरमध्ये चांगली राहण्याची सुविधा नाही. येथे भक्तनिवास बांधण्यासाठी दोन ते तीन जागा पाहण्यात आल्या होत्या. 
मात्र वन्यजीव विभागाच्या हद्दीत मोठे भक्तनिवास बांधता येणार नाही, असे सांगण्यात आल्यामुळे भीमाशंकरच्या बाहेर राजपूर गावाजवळ भक्तनिवास हलविण्यात आले. हेच भक्तनिवास भीमाशंकरमध्ये झाले असते तर यात्रेकरूंची चांगली सोय झाली असती. 
 
भीमाशंकरला घोडेगाव व तळेघर केंद्रातून विद्युतपुरवठा केला जातो. डोंगरद:या व जंगलातून लाईटचे पोल गेले असल्यामुळे पावसाळ्यात हे पोल पडणो तसेच पोलवर झाडांच्या 
फांद्या पडून लाईट बंद होणो अशा घटना सतत घडत असतात. जंगलातील पोल बदलण्यास व जंगलातून केबलद्वारे लाईट भीमाशंकर्पयत पोहोचवण्यास वन्यजीव विभाग परवानगी देत नाही. या कामासाठी देखील रीतसर प्रस्ताव सादर करून परवानगी घ्यावी, असे सांगितले जाते. 
 
नो रेंज!
भीमाशंकरमध्ये मोबाईलची रेंज नाही. त्यामुळे लाखो भाविकांना इतरत्र संपर्क करता येत नाही. ‘बीएसएनएल’ने काही वर्षापूर्वी बदलापूर केंद्रातून टॉवरद्वारे भीमाशंकरला मोबाईल सुरू केले होते. मात्र, ही यंत्रणा पूर्ण बिघडली असल्यामुळे मोबाईल नेहमीच बंद असतात. इतर खासगी कंपन्या भीमाशंकरमध्ये मोबाईल टॉवर उभारू इच्छितात; मात्र तळेघर येथून भीमाशंकर्पयत ओएफसी केबल टाकण्यास वन्यजीव विभाग परवानगी देत नाही. ही केबल टाकायची असेल तर प्रस्ताव सादर करावा व त्यानंतर परवानगी दिली जाईल, असे सांगितले जाते. भीमाशंकरमध्ये मोबाईलची रेंज नसल्यामुळे येथील ग्रामस्थही त्रस्त झाले आहेत. 
 
भीमाशंकरकडे जाण्यासाठी निगडाळे गावापासून वन्यजीव विभागाच्या हद्दीतून रस्ता आहे. हा रस्ता अत्यंत छोटा असल्यामुळे दोन मोठय़ा गाडय़ा बसत नाहीत. त्यामुळे o्रावण महिन्यात व इतर गर्दीच्या दिवशी येथे नेहमी वाहतूककोंडी होते. रस्ता बारीक असल्यामुळे o्रावण महिन्यात चार किलोमीटर अलीकडेच एसटी बस व इतर मोठय़ा गाडय़ा थांबवल्या जातात. तसेच हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या कामासाठीदेखील परवानगी लागत असल्यामुळे यात्रेकरूंना वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागते. 
 
तीर्थक्षेत्र विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठा निधी मिळतो. मात्र, वन्यजीव विभागाच्या जाचक अटींमुळे येथे काम करता येत नाही. वन्यजीव विभागाच्या हद्दीत काम करण्यासाठी परवानगीच्या फाईल पुणो, नागपूर, भोपाळ, दिल्लीर्पयत  फिरतात. या परवानगीच्या जाचक प्रक्रियेमुळे भीमाशंकरचा विकास रखडला आहे. 
 
भीमाशंकरला आरोग्य केंद्र व पोलीस चौकी मंजूर आहे. मात्र, हे बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे सध्या जुन्या पडक्या दोन खोल्यांमध्ये आरोग्य केंद्र व पोलीस चौकी सुरू आहे. एवढे मोठे तीर्थक्षेत्र असतानाही जागेअभावी येथे डॉक्टर राहू शकत नाहीत व पोलीस थांबू शकत नाहीत.
 
व्यवसाय वाढत नाहीत
भीमाशंकरमध्ये जागा नसल्यामुळे व्यवसाय वाढत नाहीत. सध्या असलेली हॉटेल,
प्रसादांची दुकाने कच्ची पत्र्याच्या शेडची आहेत. येथे व्यवस्थित दुकाने झाल्यास व्यवसाय वाढेल व यात्रेकरूंची सोय होईल. येथील दुकानदार अनेक वर्षापासून पक्की दुकाने  मिळावीत, अशी मागणी करत आहेत. दर वर्षी o्रावण महिन्यात पाय:यांच्या कडेला स्थानिक गावांमधील आदिवासी लोक तात्पुरती दुकाने लावतात. वन्यजीव विभागाचे अधिकारी ही लावलेली दुकाने काढून टाकतात. त्यामुळे स्थानिक लोक व वन्यजीव विभागाचे कर्मचारी यांच्यात संघर्ष होत असतो.