भिगवण : पुणो-सोलापूर महामार्गावर भिगवण बसस्थानकानजीकच्या पुलावर खासगी कंपनीची बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्या शेजारील घरात घुसली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाली होती.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यामध्ये जखमी प्रवासी बालाजी सुरेश माने (रा. उदगीर, जि. उस्मानाबाद) यांनी बसचालका विरोधात तक्रार दाखल
दिली आहे. या अपघातात 15 ते 2क् प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासी बालाजी माने यांच्या कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले आहेत. जखमींवर थोरात हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवार (दि.24) रोजी पहाटे 3 वाजता हा अपघात घडला. मुख्य रस्ता सोडून तसेच सर्विस रस्ता ओलांडून बस कांतीलाल रायसोनी यांच्या घरावर जावून आदळली. त्यामुळे घराचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने या घरा मध्ये कोणी राहत नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघात झाल्यानंतर बसचालक पळून गेला. त्याचा तपास भिगवण पोलीस करीत आहेत. चालकाने मद्य प्राशन केल्याचे या वेळी प्रवाशांनी सांगितले. (वार्ताहर)
4अपघातात 2क्-3क् प्रवासी जखमी झाले.
4प्रवासी बालाजी माने यांच्या कुटुंबातील चार जण जखमी.
4अपघातसमयी घरात कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
4जखमींवर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू.