शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भलवडी संस्थेची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: December 30, 2014 22:54 IST

भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत माजी सरपंच अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी बाजी मारली.

पाईट : भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत माजी सरपंच अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी बाजी मारली. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१३ नुसार खेड तालुक्यातील सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. तालुक्यातील निवडणूक लागलेल्या पहिल्या विविध सहकारी संस्थेची निवडणूक पार पडली . या निवडणुकीत राजगुरुनगरचे माजी सरपंच अतुल देशमुख यांचे सदस्य या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याने या सोसायटीवर अतुल देशमुख यांनी वर्चस्व राखले आहे.भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेकरिता ८ जागांसाठी १४ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. यामध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी माघार घेतल्यावर ८ जागेसाठी ८ उमेदवार राहिले, तर महिलांच्या दोन जागेकरिता ३ उमेदवार होते. त्यापैकी बबाबाई गिरहे यांनी माघार घेतल्याने २ जागा बिनविरोध झाल्या, तर इतर मागासवर्ग व अनुसूचित जाती या वर्गासाठी एक एकच अर्ज आल्याने त्या जागाही बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भुजबळ यांनी जाहीर केले.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विराम, भलवडी औढे ग्रामस्थांनी प्रयत्न केले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष भुजबळ यांनी काम पाहिले. या कामी सहायक म्हणून संस्थेचे सचिव अशोक टाव्हारे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)४सर्वसाधारण : जागा ८ : लक्ष्मण सावंत, विनोद शिंदे, तुकाराम सावंत, लक्ष्मण सावंत, भागुजी सावंत, सोपान गिरहे, आंकुश गिरहे, भागुजी गिरहे४इतर मागास राखीव : जागा १ : ज्ञानेश्वर सावंत ४अनु. जाती राखीव : जागा १ : चिमा रोकडे ४महिला राखीव : जागा २ : अलका गिरहे, सुमनबाई गिरहे