शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाटघरमधून विसर्ग वाढविला

By admin | Updated: November 26, 2015 01:01 IST

आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले

भोर : आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. यंदा तालुक्याला लवकर टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. पूर्वेकडील भागाला सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सदरचे पाणी सोडल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. यावर्षी ७० टक्केच पाणीसाठा आहे. पुरंधर तालुक्यातील वीर धरणात ४० टक्केच पाणीसाठा असून, तेथून डाव्या व उजव्या कालव्यातून १२ दिवसांपासून पाणी खाली सोडण्यात आले आहे. त्यामुळे वीर धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे रविवारी नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी खाली सोडले होते. मात्र, धरणग्रस्तांनी सदरचे पाणी बंद केले. मग सोमवारी भाटघर धरणातून सुरुवातीला १३५० क्युसेक्सने व मंगळवारी २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडण्यात येत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २ हजार क्युसेक्सने पाणी खाली सोडण्याचे ठरले होते. मात्र, वीजनिर्मिती केंद्रात बिघाड असल्याचे कारण सांगत इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडले आहे. ६०० क्युसेक्स पाणी जादा सोडण्यात येत आहे. जादा पाणी सोडण्याच्या हेतून फक्त पावसाळ्यात वापरले जाणारे गेट उघडून पाणी सोडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)