शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग, २७ बुकींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेसकाेर्स येथील घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे ‘बेटिंग’ घेणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली असून चार ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेसकाेर्स येथील घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे ‘बेटिंग’ घेणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली असून चार ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात आले. त्यात २७ बडे ‘बुकी’ तसेच खेळायला येणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली. शहराच्या विविध भागात शनिवारी (दि. १२) पहाटेपर्यंत ही कारवाई सुरु होती. याप्रकरणी वानवडी, कोंढवा, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शब्बीर मोहसीन खंबाटी (वय ७०, रा. पदमव्हिला सोसायटी, वानवडी) यांना अटक केली आहे. सध्या मुंबईतील रेसकोर्सवर कोराेना केंद्र केल्याने तेथील शर्यती पुण्यात होत आहेत. रेसकार्समध्ये शासनाचा परवाना घेऊन त्यांचा सर्व कर भरुन बेटिंग घेणाऱ्यांना परवाना दिला जातो. त्याशिवाय किक्रेटप्रमाणे टीव्हीवर शर्यती पाहून बेटिंग घेतले जात होते. घोड्यांच्या नावाने बेटिंग घेत होते. या बंगल्यातून पोलिसांनी बेटिंगसाठी वापरलेले साहित्य आणि मोबाईल असा ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

घोरपडी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील डोबरबाडी येथील मोकळ्या मैदानात शुक्रवारी दुपारी बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. येथे पोलिसांनी छापा घालून बेटिंग घेणाऱ्या व खेळणाऱ्या अशा २० जणांना अटक केली आहे. तन्मय वाघमारे हा त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या नावाचे सीमकार्ड वापरून सीमकार्डधारकाची फसवणुक करुन बेटिंग घेताना मिळून आला.

यात अनेक बड्या असामीचा समावेश आहे. याबरोबरच हडपसर तसेच कोंढवा येथे छापा घालून बेटिंग घेणाऱ्यांना अटक केली आहे. बेकायदेशीरपणे बेटिंग घेणाऱ्या व खेळणाऱ्या मोठ्या रॅकेटवर ही इतक्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.