शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी व माणूस संघर्ष व्यवस्थापनाचा उत्तम नमुना

By admin | Updated: February 15, 2017 01:14 IST

माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्र हे वनविभाग व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले राज्यातील एकमेव केंद्र आहे

जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्र हे वनविभाग व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले राज्यातील एकमेव केंद्र आहे. माणिकडोह धरणाच्या लगत हे केंद्र वसलेले आहे. सन २००० सालापासून उत्तर-पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या समस्येने डोके वर काढले. २००२ मध्ये वन विभागाने त्यांच्या माणिकडोह येथील रोपवाटिकेच्या क्षेत्रात बिबट निवारा केंद्राची स्थापना केली. आता माणिकडोह गाव येथील बिबट निवारा केंद्रामुळे सर्वत्र परिचित झाले आहे. धरण रस्त्यावर जुन्नरपासून अवघ्या ५ किमी अंतरावर ‘बिबट निवारा केंद्र’ आहे.वन्यप्राणी संघर्षाच्या व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या केंद्राची वेगळी ओळख बनली आहे. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात घोड प्रकल्पांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश होतो. विभागातील जवळपास ५८२ चौरस किमी वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र बिबट्यांच्या निवासासाठी पोषक असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर पूर्वापर आहे. जलसिंचनाच्या विविध प्रकल्पांमुळे १९९० नंतर साखर कारखाने उभे राहू लागले. त्यामुळे ऊसलागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यातच वन्यक्षेत्र, निवारा, भक्ष्य कमी होऊ लागल्याने बिबट्याने आपले वस्तीक्षेत्र मानवी वस्तीजवळ ऊसशेती निवडली. बिबट्यांच्या अन्न, पाणी, निवारा, प्रजनन, संरक्षण अशा सर्वच गरजा भागवण्यास ऊसशेती पोषक ठरू लागल्याने वनक्षेत्रातील बिबटे उसाच्या शेतात वास्तव्याला आले. पण, उसाच्या शेतात वास्तव्यास असलेले बिबटे भक्ष्याच्या शोधात जवळपासच्या गावातील मानवी वस्तीत येऊ लागले. देखभालीचा खर्च उचलणे एकट्या वन विभागाला अडचणीचे होते. शक्यच शिवाय, बिबट्यांवरील संशोधन, त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास, लोकजागृती व प्रबोधन, प्रशिक्षण अशी इतर कामे करण्याबाबत वन विभागाच्या मर्यादा लक्षात घेऊन शासनाच्या मान्यतेनुसार जानेवारी २००७ पासून निवारा केंद्र देखभालीसाठी ‘वाइल्ड लाइफ एस. ओ. एस.’ सेवाभावी संस्थेकडे हस्तांतरित केले. सध्या डॉ. अजय देशमुख, सहकारी महेंद्र ढोरे केंद्राचे व्यवस्थापन पाहतात.