शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली चित्रपट पुण्यात

By admin | Updated: December 23, 2016 01:01 IST

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये प्रादेशिक चित्रपटांच्या दर्जेदार मांडणी आणि प्रभावी सादरीकरणाने ज्येष्ठ दिग्दर्शक ऋत्विक घटक

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये प्रादेशिक चित्रपटांच्या दर्जेदार मांडणी आणि प्रभावी सादरीकरणाने ज्येष्ठ दिग्दर्शक ऋत्विक घटक यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपटक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले त्यांचे तीन अपूर्ण आणि अद्याप प्रदर्शित न झालेले चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) मिळाले आहेत. देश-विदेशातील विविध छोटी संग्रहालये, अभ्यासक, चित्रपटप्रेमी मंडळी यांच्याकडे असलेले दुर्मिळ चित्रपट मिळवून ते जतन करण्याची मोहीम एनएफआयआयने हाती घेतली आहे. ऋत्विक घटक यांची मुले संहिता घटक आणि रितबन घटक यांच्या ‘ऋत्विक घटक मेमोरियल ट्रस्ट्र’ने घटक यांच्या अपूर्ण आणि अप्रदर्शित चित्रपटांची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली होती. त्यानुसार एनएफएआयने पश्चिम बंगाल राज्य सरकारकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला. तीन महिन्यांपासून हे चित्रपट मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सरकारने त्याला मान्यता दिली असून, ऋत्विक घटक यांचे ‘काटो अजनारे’ (१९५९), बंगार बंगा दर्शन (१९६४) आणि रांगेर गुलाम (१९६८) हे अपूर्ण चित्रपट एनएफएआयला जतन व संवर्धनासाठी मिळाले असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.या चित्रपटांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या चित्रपटांची पाहणी आणि तपासणीसाठी एनएफएआयचे तज्ज्ञ नुकतेच कोलकाता येथे गेले होते. त्यांनी या चित्रपटांची पाहणी केल्यानंतर हे चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्याच्या स्थितीत असल्याचे लक्षात आले. (प्रतिनिधी)