पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्ट आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाची शुक्रवारी महाप्रसादाचा कार्यक्रमाने सांगता झाली. एक लाखाहून अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
शुकवारी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र देवमहाराज व चिंचवड ब्रrावृंदाच्या हस्ते श्री मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा झाली. त्यानंतर समाधी मंदिरावर रिमोट हेलिकॅप्टरद्वारे पुष्यवृष्टी करण्यात आली. (प्रतिनिधी)
4महोत्सवांतर्गत गुरुवारी रात्री झालेल्या पं. विश्वमोहन भट (जयपूर) यांच्या मोहनवीणा वादनाच्या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पं. भट यांना तबल्यावर हिमांशू महंत (बडोदा) यांनी साथसंगत केली.
सजर्नशील कलावंतांच्या कलाकृतींमध्ये नेहमी द्वंद दिसून येते. काही वेळेस अनुभवांना काव्यात्मकता लाभत नाही. कविता वाचून डोळ्यांत पाणी येणो, ही संवेदनेची तरलता कवितेतच नाही तर मानवी नातेसंबंधातसुद्धा पाहायला मिळते.
- वसंत डहाके
साहित्यिक