शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

लाखापर्यंतच्या खातेदारांना मिळणार पैसे, खातेदार-ठेवीदारांकडून अर्ज मागविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:25 IST

विमा महामंडळाकडे (डीआयसीजीसी) बँकेच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने लोकसेवा बँकेच्या एक लाख रुपयांपर्यंत रक्कम असणाऱ्या खातेदारांना संपूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे : विमा महामंडळाकडे (डीआयसीजीसी) बँकेच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने लोकसेवा बँकेच्या एक लाख रुपयांपर्यंत रक्कम असणाऱ्या खातेदारांना संपूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या ९ हजार २८१ खातेदारांना फायदा होणार आहे. शुक्रवारपासून (दि. १६) बँकेच्या खातेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यांना खात्यातील रकमेचा धनादेश देण्यात येणार आहे.आर्थिक अनियमिततेमुळे लोकसेवा सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदार-ठेवीदारांचे पैसे खात्यात अडकले आहेत. लोकसेवा बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी विमा महामंडळाकडे एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे, बँकेच्या निधीतूनच हे पैसे देण्याची बँकेची तयारी आहे.विमा महामंडळाला प्रस्ताव आणि स्मरणपत्रे पाठवूनही त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून काहीच कार्यवाही होत नव्हती. अखेरीस सहकार विभागाच्या मान्यतेचे पत्र आणि इतर अटी व शर्तींसह विमा महामंडळाने लोकसेवा बँकेच्या अवसायकांना एक लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या खातेदारांना पैसे देण्याची परवानगी दिली आहे. लोकसेवा बँकेला १८० कोटी रुपयांच्या ठेवी द्यायच्या आहेत. त्यात ८३ पतसंस्थांच्या १२२ कोटी रुपयांचा समावेश आहे. तर, दीड हजार ठेवीदारांचे ४२ कोटी रुपये देणे आहे. तर, एक लाखावरील ठेवी असणारे १ हजार १७७ खातेदार आहेत. त्यांचे १६३ कोटी ५७ लाख रुपयांच्या ठेवी देणे आहेत.>खातेदारांना आवश्यक कागदपत्रेएक लाख रुपयांपर्यंत ठेवी असणाºया खातेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक छायाचित्र आवश्यक आहे. जॉइंट खाते असल्यास दोघा खातेदारांचा फोटो गरजेचा आहे. ही कागदपत्रे नसल्यास वाहनपरवाना अथवा शिधापत्रिका पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अर्ज भरल्यानंतर खातेदारांना एक तारीख दिली जाईल. त्या दिवशी त्यांना रकमेचा धनादेश दिला जाईल.>बँकेचे एक लाख रुपयापर्यंत रक्कम असलेले ९ हजार २८१ खातेदार आहेत. त्यांना १७ कोटी ९८ लाख रुपयांची देणी द्यायची आहेत. बँकेकडे सप्टेंबर २०१७ अखेरीस १२८ कोटी रुपयांची रोखता (लिक्विडीटी) होती. जानेवारी महिन्यापर्यंत चार कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर ठेवींवर एक कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे. त्यामुळे बँकेची रोखता वाढली आहे.