शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे पुणे जिल्ह्यातील बैलगाडामालक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि. १३ रोजी करण्यात आले आहे. या वेळी बैलगाडा शर्यती व कायदेशीर बाबी या विषयावर माजी न्यायाधीश अशोक कोळसे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर चौधरी यांनी दिली. पाबळ येथील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, भोसरी, हवेली, मावळ आदी भागांतील बैलगाडामालक उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांतील कायदेविषयक माहिती व बैलगाडा शर्यतीबाबत दिशा ठरविण्यात येणार आहे. आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीवेळी दगडफेकीचा प्रकार घडला होता. (वार्ताहर)
बैलगाडामालकांची पाबळला उद्या बैठक
By admin | Updated: January 11, 2015 23:47 IST