पुणे : पिंपरी बाजार आवार व बाजार क्षेत्र यामधील शाब्दिक खेळामध्ये न अडकता नोटिफिकेशनमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची कार्यवाही सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासनास सूचना दिल्या आहेत. तसेच व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी दिली.बाजार समिती प्रशासनाने जुन्या नोटिफिकेशनच्या आधारावर पिंपरी बाजारातील व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. नियमनमुक्तीला हरताळ फासणाऱ्या या नोटिसा रद्द करण्याच्या सूचना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार समितीकडून नोटिसा रद्द करण्यात येत असल्याचे खैरे यांनी सांगितले. नोटिफिकेशनमध्ये बाजार क्षेत्र व बाजार आवार याबाबत गैरसमज करणारी वाक्यरचना असल्याने व संबंधित व्यापारी यापूर्वी बाजार समितीकडे नियमित सेस भरत असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने सेस मागणीच्या नोटिसा दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे
By admin | Updated: January 23, 2017 03:22 IST