शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘जबाबदार पर्यटक’ होतोय बेभान!

By admin | Updated: June 29, 2017 03:25 IST

आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माळशेजघाट सध्या बहरून गेला असून, माळशेज घाटाच्या या सौंदर्याची भुरळ मात्र पर्यटकांना होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माळशेजघाट सध्या बहरून गेला असून, माळशेज घाटाच्या या सौंदर्याची भुरळ मात्र पर्यटकांना होत आहे. वर्षासहलीसाठी अनेक पर्यटकांना निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या माळशेजचे सध्या वेध लागले आहेत. एक पर्यटक म्हणून निसर्गाचा आनंद उपभोगणे हा जरी आपला स्वयंघोषित मानवी हक्क असला, तरी माळशेज घाटात आलेल्या माणसामध्ये एक जबाबदार पर्यटक दिसून येत नाही किंवा माणसातला जबाबदार पर्यटक बेभान होताना दिसतोय. ही दुर्दैवाची बाब आहे. सह्याद्रीच्या पोटातून निघणाऱ्या वऱ्हाडी डोंगर रांगांच्या डोक्यावरून घाटमाथ्याहून खाली कोकणाकडे जाण्यासाठीचा एक रस्ता माळशेज घाटातून जातो. माळशेज घाट प्रशासकीयदृष्ट्या जरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येत असला, तरी त्याची जोड ही जुन्नरलाच लागून आहे. जुन्नरच्या पर्यटनाला येणारे पर्यटक हे माळशेज घाटात जातात किंवा माळशेज घाटात येणारे पर्यटक हे जुन्नरला येत आहेत.माळशेज घाटातील सुंदर निसर्ग, दुर्मिळ फुलझाडे, परदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान, आपल्या दिमाखात मिरवणारा माळशेज घाट पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाल्याशिवाय राहत नाही. मुंबईकडून माळशेजकडे येताना दिसणारा नाणेघाट, त्याच्या बाजूचे भोरांड्याचे दार, मोरोशी जवळचा डोंगराच्या पोटातील अजस्र कातळ भिंतीचा भैरवगड, माळशेज घाट चढून येत असताना जराशी धोकादायक पण साहसी वाटणारी धबधब्यांची माळ, बोगदा, घाटात विकसित झालेली निसर्ग पर्यटनाची स्थळे, घाटमाथ्यावरील एमटीडीसीचे पर्यटकांसाठीचे निवास स्थान, पुढे पिंपळगाव जोगा धरणाची पश्चिमेकडील भिंत आणि त्यावरून उत्तरेकडे जाताना डावीकडे काळू नदीच्या पलीकडे असणारे मध्ययुगीन खिरेश्वराचे मंदिर, शिंदोळा किल्ला, गणेश खिंड अशी लांबत जाणारी पर्यटनस्थळांची शृंखला पर्यटनाचा आवाका सांगून जाते.