शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

तरुणांच्या जागरूकतेमुळे ‘तो’ परतला कुटुंबात

By admin | Updated: July 2, 2017 02:12 IST

सांगवी, तालुका बारामती येथील एसटी बसस्थानकावर सापडलेला सातारा येथील अल्पमतीमंद मुलगा तरुणांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कसांगवी : सांगवी, तालुका बारामती येथील एसटी बसस्थानकावर सापडलेला सातारा येथील अल्पमतीमंद मुलगा तरुणांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या मदतीमुळे त्याच्या घरी सुखरूप पोहोचला. सागर संजय जाधव (वय १६, रा. भुर्इंज, ता. वाई, जि. सातारा) हा अल्पमतिमंद मुलगा त्याच्या घरी ३-४ दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे निधन झाले होते. यावेळी घरचे सर्व त्यातच व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत तो अचानकपणे घरी कोणालाही काही न सांगता नजर चुकवून घरातून निघून गेला. एक सॅक त्यामध्ये बूट ,कपडे ,आणि एक मोबाईल घेऊन तो एसटीने प्रवास करीत सांगवीच्या बसस्थानकावर उतरला असता, तो तेथील काही तरुणांना भेटला असता त्यांच्याशी त्याच्या संवाद साधू लागला, त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते, त्याच्याकडील बॅग पाहून त्यावेळी त्या तरुणांना तो एखाद्या आश्रमशाळेतून पळून आला असेल, असा संशय वाटू लागला, तरुणांनी त्याची विचारपूस केली, त्याला लिहिता वाचता येत नव्हते, त्याच्या कडे काही तिकीटे आढळून आली. मी माझ्या मामाच्या घरी निघालो आहे, इथे कारखाना कुठे आहे, असे तो त्याच्या बोबड्या भाषेत विचारपूस करू लागला.बोलता बोलता तो खोटे बोलू लागला. तर त्याचा मामा व नातेवाईक तिथे कोणीच नव्हते, यामुळे त्याचा संशय आला की तो पळून आला आहे, तो आणखी कुठे जाऊन काही अनर्थ होऊ नये या हेतूने वैभव बाळासाहेब जगताप, ऋषीकेश जालिंदर शिंदे, कपिल बापूसोा जगताप व काही तरुणांनी त्याला माळेगाव पोलीस स्टेशनला सूपूर्त  केले, माळेगाव दुरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल शरद वारे यांनी  अथक प्रयत्नांनंतर त्याच्या आईचा शोध लावला. त्याच्या आईला फोन करून माहिती कळवली असता, त्याची आई माळेगाव पोलीस स्टेशनला काही तासांत पोहचली व वारे यांनी सागर याला त्याच्या आईच्या हवाली केले.  घरात कोणालाही काहीही न सांगता निघून आलेल्या अल्पमतिमंद मुलाला सांगवीतील तरुणांच्या व पोलिसांच्या मदतीने त्याला त्याच्या आईची भेट करून दिली.